Sunday, May 28, 2023

भावकीनेच जीव घेतला; आधी घरात घुसून जबर मारहाण, नंतर गाडीवरही मारले

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

◆ शेतीच्या वादातून निर्घृण खून; तळणी येथील घटना

◆ सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल, लिंबगाव पोलिसांनी दोघांना घेतले ताब्यात

नांदेड– भावकीतील लोकांनीच एकाच जीव घेतल्याची घटना नांदेड तालुक्यातील तळणी येथे घडली आहे. भावकीतील लोकांनी आधी घरात घुसून जबर मारहाण, नंतर गाडीवरही उपचारासाठी रुग्णालयात जात असताना परत गाडीवरही जबर मारहाण करण्यात आली. याप्रकरणी लिंबगाव पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.

शेतीच्या कारणावरून घरात घुसून ही जबर मारहाण करून निर्घृण खून करण्यात आला. याप्रकरणी सात जणांविरुद्ध लिंबगाव पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लिंबगाव पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून पाच जण फरार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पवार यांनी दिली. ही घटना 31 जानेवारीच्या रात्री सव्वाआठच्या सुमारास घडली.

नांदेड तालुक्यातील तळणी येथील बळीराम सूर्यवंशी हे आपल्या पत्नीसह 31 जानेवारीच्या रात्री सव्वाआठच्या सुमारास घरात बसले होते. यावेळी त्यांच्याच भावकीतील काही जण त्यांच्या घरात घुसले. अश्लील शिवीगाळ करून त्यांना जबर मारहाण करण्यात आली. त्यांच्या पत्नीलाही मारहाण केली. जखमी अवस्थेत त्यांचा पुतण्या प्रदीप आणि ओमकार यांनी दुचाकी क्रमांक (एमएच 26 – 14 35) वरून तात्काळ नांदेडच्या रुग्णालयात हलविण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपींनी दुचाकी क्रमांक (एमएच 26 यु 43 13) वरून येऊन धानोरा फाटा येथे येऊन त्यांची दुचाकी अडविली. तेथेही जबर मारहाण केली. जखमी अवस्थेत बळीराम सूर्यवंशी यांना नांदेडच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान बळीराम सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी जयश्री बळीराम सूर्यवंशी यांच्या फिर्यादीवरून सात जणांविरुद्ध लिंबगाव पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सातपैकी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पाच जण फरार असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पवार करत आहेत.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,785FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles

error: Content is protected !!