Tuesday, May 21, 2024

भावाच्या मृत्यूची खबर ऐकताच बहिणीला हृदयविकाराचा झटका; उपचारादरम्यान मृत्यू; लोहानंतर आता किनवट तालुक्यात घडलेल्या घटनेने हळहळ

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

इस्लापूर- आईच्या निधनाची बातमी ऐकून मुलीचाही मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच नांदेड जिल्ह्यात पुन्हा काहीशी अशीच घटना घडली आहे. भावाच्या मृत्यूची खबर ऐकताच बहिणीला हृदयविकाराचा झटका येऊन त्यातच तिचा मृत्यू झाल्याची घटना किनवट तालुक्यातील इस्लापूर येथे घडली आहे.

आईच्या निधनाची बातमी ऐकून मुलीला हृदयविकाराचा झटका येऊन त्यातच मुलीचा मृत्यू झाल्याची घटना काही दिवसांपूर्वीच लोहा तालुक्यातील मुलीच्या बाबतीत घडली होती. त्यानंतर आता ही घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

किनवट तालुक्यातील मौजे कंचली येथील रहिवासी बाबू गाजा राठोड (वय ४५) यांचे परवा दि.१२ फेब्रुवारी सकाळी नांदेड येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान  दुपारी २ वाजता निधन झाले. ही माहिती कंचली येथे असलेल्या मयत बाबू राठोड यांच्या बहीण यशोदाबाई रामू जाधव (वय ६०) यांना शेतात काम करत असताना, नातवाने शेतात जाऊन सांगितली. ही माहिती कळताच शेतात काम करत असलेल्या यशोदाबाई धावत घराकडे आल्या. भावाच्या निधनाची बातमी सहन होत नसल्याने घरी आल्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि यातच यशोदाबाई जाधव यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

दि.१३ रोजी सकाळी १० वाजता कंचली येथे बहिणीचा अंत्यविधी करण्यात आला तर एका तासानंतर भावाचा अंत्यविधी करण्यात आला. या दुर्दैवी घटनेमुळे इस्लापूर, शिवणी, कंचली परीसरात हळहळ व्यक्त होत आहे. अंत्यविधीवेळी किसान सभेचे कॉ.अर्जुन आडे, भाजपाचे गणपत राठोड, दिपसिंग राठोड, माजी सभापती नारायण मिटू राठोड आणि  शिवणी व कंचली पंचक्रोशीतिल सामाजिक, राजकीय क्षेत्रातील विविध व्यक्तींसह शेतकरी, गावकरी मोठ्या संख्येने अंत्यविधीस उपस्थित होते.

या भागातील माजी आमदार प्रदीप नाईक यांनी कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. भाजपा तालुका सरचिटणीस बालाजी आलेवार, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रकाश गब्बा, पोलीस पाटील संघटनेचे शिवराम जाधव, बालाजी बामणे, प्रकाश राठोड, रुपासींग राठोड, मनोज राठोड, बाळासाहेब शेरे, संतोष जाधव आदींनीही दोन्ही परिवाराला भेटून यांचे सांत्वन केले.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]

Latest Articles

error: Content is protected !!