Tuesday, October 3, 2023

भावाला जेलमधुन सोडवण्यासाठी दहा लाख रुपयांच्या खंडणीची मागणी; तलवारीने गाडीच्या काचा फोडल्या, विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड- कारागृहात असलेल्या भावाला सोडवण्यासाठी दहा लाख रुपयांची खंडणी दे असे म्हणून तलवारीने एकाच्या चार चाकी वाहनावर हल्ला करण्यात आल्याचा प्रकार नांदेड शहराच्या गंगानगर सोसायटी भागात 14 रात्री साडेदहाच्या सुमारास घडला आहे.

नांदेड शहराच्या गंगानगर सोसायटी येथील व्यापारी रामाश्रय विश्वनाथ सहाने (वय 37) हे दि. 14 मार्च रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास आपल्या घराकडे जात होते. याचवेळी दोघांनी त्यांची गाडी अडविली. आणि मोबाईल फोनवर सांगितल्याप्रमाणे दहा लाख रुपयांची खंडणी दे अशी मागणी केली. माझा जीव घेतला तरी माझ्याकडे पैसे नाहीत असे रामाश्रय सहानी यांनी स्पष्टपणे सांगितले. त्यानंतर “मेरा भाई जेल मे है, उसको छुडाने के लिए, दस लाख रुपये दो, नही तो जान से मार दुंगा” अशी धमकी आरोपींनी सहानी यांना दिली. एवढ्यावरच न थांबता रामाश्रय सहानी यांच्या चार चाकी वाहनावर आरोपींनी तलवारीने वार करीत काचा फोडल्या. तसेच दरवाजावर लाथा मारून जीवे मारायची धमकी दिली.

रामाश्रय सहानी यांच्या फिर्यादीवरून विमानतळ पोलीस ठाण्यात आकी उर्फ आकाश गोविंद लुळे व इतर दोन जणांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेख जावेद करत आहेत.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]

Latest Articles

error: Content is protected !!