Friday, July 19, 2024

भीमराव जमदाडेने केला भीमराव जमदाडेचा खून, दारू का पाजत नाहीस म्हणत डोक्यात दगड घातला; हदगाव तालुक्यातील घटना

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड/ हदगाव– दारू का पाजत नाहीस असे म्हणत साठ वर्षीय व्यक्तीचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार हदगाव तालुक्यातील बरडशेवाळा येथे घडला आहे. आरोपीविरुद्ध मनाठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी आरोपी भीमराव सोमजी जमदाडे याला अटक केली आहे. भीमराव जमदाडे अशीच मयत आणि आरोपी दोघांची नावे आहेत.

हदगाव तालुक्यातील बरडशेवाळा येथील इलेक्ट्रिशियनचा व्यवसाय करणारे भीमराव तुकाराम जमदाडे (वय 60) असे मयताचे पूर्ण नाव आहे. बरडशेवाळा येथील बायपास पुलाच्या रस्त्याजवळ भीमराव सोमाजी जमदाडे (वय 45) याने भीमराव तुकाराम जमदाडे यांना रस्त्यात अडविले. मला दारू का पाजत नाहीस अशी विचारणा करीत त्यांच्याशी आधी वाद घालण्यास सुरुवात केली, आणि नंतर शिवीगाळ करीत भीमराव तुकाराम जमदाडे यांच्याशी त्याने झटापट सुरू केली. एवढेच नाही तर एकदमच त्यांना बायपास पुलाच्या रस्त्यालगत असलेल्या नाल्यांमध्ये ढकलून त्यांच्या डोक्यात चक्क मोठा दगड घातला. यात भीमराव तुकाराम जमदाडे हे जागीच मृत्यू झाला.

ही माहिती मनाठा पोलिसांना मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण हे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर किरण भीमराव जमदाडे या मयताच्या मुलाने दिलेल्या फिर्यादीवरून मनाठा पोलीस ठाण्‍यात भीमराव सोमाजी जमदाडेविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास स्वतः सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण करत आहेत. आरोपीला पोलिसांनी अटक केली असून तो सध्या पोलीस कोठडीत आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!