Tuesday, December 3, 2024

भोकरजवळ टेम्पोने मॅजिक ऑटोला उडवले, ४ जण ठार तर ५ जण गंभीर जखमी; सीताखंडी घाटात अपघात

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

भोकर (जि. नांदेड)- भोकरजवळ विटा घेऊन निघालेल्या एका टेम्पोने मॅजिक ऑटोला उडवल्याने झालेल्या भीषण अपघातात ४ जण ठार झाले आहेत. तर ५ जण गंभीर जखमी झाले आहेत.

नांदेड ते भोकर दरम्यान सीताखांडीजवळ मॅजिक ऑटो आणि टेम्पोच्या समोरासमोर झालेल्या धडकेमध्ये चार जण ठार तर पाच जण गंभीर जखमी झाले. ही घटना आज सोमवार दिनांक 19 जून रोजी दुपारी चारच्या सुमारास घडली. जखमींना भोकर आणि नंतर नांदेडच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मयतांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे.

नांदेड जिल्ह्यातील भोकरपासून जवळच असलेल्या सीताखांडी येथे नांदेडहून भोकरकडे विटा घेऊन निघालेल्या टेम्पो क्रमांक (एम एच-26- 3815) आणि  भोकरहून नांदेडकडे निघालेल्या मॅजिक ऑटोची समोरासमोर भीषण धडक झाली. या धडकेत भुलाबाई गणेश जाधव (वय 45, राहणार पोटा तांडा, तालुका हिमायतनगर), संदीप किशन किसवे (वय 25 राहणार हळदा, तालुका भोकर), संजय इरबा कदम (वय 48,  राहणार हिमायतनगर) आणि बापूराव रामसिंग राठोड (वय 57, राहणार पाकी तांडा, तालुका भोकर) हे जागीच ठार झाले. तर परमेश्वर केशव महाजन विर्सनी तालुका हिमायतनगर, देविदास गणेश जाधव पोटा तांडा तालुका हिमायतनगर, मंगेश गोविंद डुकरे राहणार लहान, तालुका अर्धापूर, कैलास गणपत गडमवार राहणार शिरजणी, तालुका भोकर हे गंभीर जखमी झाले आहेत.

अपघाताची माहिती समजताच भोकर आणि बारड महामार्गाचे पोलीस घटनास्थळी धावले. जखमींना भोकरच्या शासकीय रुग्णालयात आणि नंतर नांदेडच्या रुग्णालयात दाखल केले. घटनास्थळाचा पंचनामा करून सर्व मृतदेह भोकर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी भोकर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद प्रक्रिया सुरू होती. घटनास्थळाला वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भेट दिली.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!