ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

भोकर (जि. नांदेड)- दोन दिवसांपूर्वीच लग्न झाल्यानंतर लग्नानंतरचे विविध विधी पार पाडण्यासाठी नवरीला घेऊन जात असताना वऱ्हाडाचे महिंद्रा मैक्सिमो हे वाहन आणि टेम्पोचा समोरासमोर भीषण अपघात झाला. यात वऱ्हाडाच्या वाहनातील 5 जण जागीच ठार झाले आहेत. यात नवरी आणि तिच्या भावाचाही समावेश आहे.
ही दुर्घटना आज सोमवारी २१ फेब्रुवारी रोजी सायं. ६ वाजताच्या सुमारास भोकर-हिमायतनगर राष्ट्रीय महामार्गावर घडली. अपघाताची भीषणता पाहता मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अपघातात 7 जण गंभीर जखमी झाले आहेत. पोलीस घटनास्थळी पोहोचले असून जखमींना उपचारासाठी भोकर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
भोकरनजीकच्या मौजे सोमठाणा जवळील साई ढाब्याजवळ हा भीषण अपघात झाला आहे. धर्माबाद तालुक्यातील जारीकोट येथे दोन दिवसांपूर्वी लग्न झालेल्या घरातील वऱ्हाडी मंडळी हे सखरा ता.उमरखेड, जि. यवतमाळ येथे लग्नानंतरच्या अरतन-परतन कार्यक्रमांसाठी निघाले होते. एका मँक्सॊमो क्र. एम.एच. 29 AR 3219 या वाहनाने ते जात असताना हिमायतनगरकडून भोकर कडे येणाऱ्या वीट भरलेल्या एम.एच. 04 AL 9955 या टेम्पोने वऱ्हाडाच्या वाहनाला समोरासमोर जोराची धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की यात नवरीसह पाच जण जागीच ठार झाले आहेत. नवरीचा मृत्यू झाला आहे तर नवरदेव नागेश साहेबराव कनेवाड (रा. जारीकोट, ता. धर्माबाद) हा गंभीर जखमी झाला आहे. या मँक्सीमो गाडीमध्ये १२ जण प्रवास करीत होते. या अपघातातील जखमींना भोकर शासकीय रुग्णालयांत दाखल करण्यात आले आले आहे.
घटनास्थळी पोलीस उपविभागीय अधिकारी गोपाळ रांजणकर आणि पोलिस निरिक्षक विकास पाटील यांच्यासह सहाय्यक पोलिस निरीक्षक रसुल तांबोळी, पोलीस उपनिरिक्षक अनिल कांबळे व इतर कर्मचारी दाखल झाले आहेत.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
