Monday, October 2, 2023

भोकर तालुक्यात शेतकरी दाम्पत्यावर वीज कोसळली; महिलेचा जागीच मृत्यू, पती गंभीर जखमी

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

भोकर (जि. नांदेड)- मागील अनेक दिवस दडी मारल्यानंतर नांदेड शहर व जिल्ह्यात आज गुरूवार दि.8 सप्टेंबर रोजी दुपारी जोरदार पाऊस झाला. या दरम्यान भोकर तालुक्यातील पिंपळढव येथे शेतकरी दाम्पत्यावर वीज पडून शेतकरी महिला जागीच मरण पावली. यात पतीही गंभीर भाजला असून त्यांच्यावर भोकरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे.

जिल्ह्याच्या सर्वच तालुक्यांमध्ये जुलै महिन्यातच वार्षिक सरासरी इतक्या पावसाची नोंद झाल्यानंतर ऑगस्ट महिन्यात मात्र वरुण राजाने पाठ फिरवली होती. ऑगस्ट महिन्यात अपेक्षित असलेला पाऊस यंदा झालाच नाही; पण हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार गुरूवारी दुपारी नांदेड शहर व जिल्ह्याच्या अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस झाला. या दरम्यान भोकर तालुक्यात पिंपळढव येथील शेतकरी सुभाष पोले व त्यांच्या पत्नी ललिता (वय ३८) हे दोघे शेतामध्ये काम करत असताना दुपारी अचानक वीज कोसळली. यात  ललिता पोले यांचा जागीच मृत्यू झाला, तर सुभाष पोले हे जखमी झाल्याचे सांगण्यात आले. 

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]

Latest Articles

error: Content is protected !!