Monday, June 17, 2024

भोकर पोलिसांनी दुचाकी चोरट्याकडून जप्त केल्या १४ दुचाकी

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड/ भोकर– मागील काही दिवसापासुन पोलीस स्टेशन भोकर व परिसरात मोठ्या प्रमाणात दुचाकी चोरीचे प्रकार वाढले होते. या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार अनिल कांबळे यांच्या पथकाने कारवाई करत एका दुचाकी चोरट्यास अटक केली. त्याच्याकडून तब्बल चौदा दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

यासाठी भोकर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक तयार करण्यात आले होते. या पथकांनी मागील महिन्यात आरोपी अनिल उत्तम गवारे रा. बळीरामपुर यास अटक केली होती. त्याची कसून चौकशी करण्यात आली असता त्यांने गुन्हयाची कबुली देवून चोरलेल्या अकरा मोटारसायकल पोलिसांच्या सुपूर्द केल्या. या मोटारसायकलींची किंमत सुमारे साडेपाच लाख रुपयये असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

त्यातील आठ मोटार सायकल पोलीस स्टेशन भोकर येथील गुन्ह्यातील आहेत. तसेच आरोपी नामे बाबु मामीलवार रा. टाकराळा यास सुध्दा अटक करून त्याचीही कसून चौकशी करण्यात आली असता त्यानेही गुन्ह्याची कबुली देवुन अडीच लाख रुपये किंमतीच्या पाच मोटारसायकली पोलिसांना दिल्या. त्यातील एक मोटार सायकल पोलीस स्टेशन भोकर येथील गुन्ह्यातील असून उर्वरीत मोटारसायकल मालकांचा शोध घेणे सुरु आहे.

पोलीस स्टेशन भोकर येथील मागील दोन महिन्यात दोन आरोपी अटक करुन त्यांचेकडे एकुण आठ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. भोकर येथे एकुण 18 मोटार सायकल चोरींचे गुन्हे दाखल असुन त्यापैकी 14 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत असुन नागरिकांनी आपल्या चोरीला गेलेल्या वाहनाची ओळख पटवुन पोलीस स्टेशन भोकर येथुन घेवुन जावे असे आवाहन करण्यात आले आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल कांबळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार दिलीप जाधव, व्यंकट आलेवार, मोहन खेडकर करत आहेत. पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजय कबाडे, उपविभागीय पोलिस अधिकारी रांजणकर आणि पोलीस निरीक्षक विकास पाटील यांनी  या पथकाचे कौतुक केले आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!