Thursday, June 1, 2023

भोकर येथे ट्रकने ऑटोला उडवले, महिला जागीच ठार तर पतीसह ऑटो चालक गंभीर जखमी; ट्रक सोडून चालक फरार

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

◆ राष्ट्रीय महामार्ग उपविभागाच्या  बेजबाबदारपणामुळे अनेकांचे बळी

भोकर (जि. नांदेड)- भोकर येथे ट्रकने ऑटोला उडवले असून यात प्रवासी महिला जागीच ठार झाली आहे. तर ऑटोतील या महिलेच्या पतीसह ऑटो चालक गंभीर जखमी झाला आहे. या अपघातानंतर ट्रक चालक ट्रक सोडून फरार झाला आहे.

शहरातील सुभेदार रामजी आंबेडकर चौक उमरी- म्हैसा बायपास रोड ठिकाणी शुक्रवार दिनांक २३ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वाजताच्या दरम्यान भोकरहुन उमरीकडे जाणाऱ्या (एमएच २६ एसी ४१५७) क्रमांकाच्या ॲप्पे ऑटोला तेलंगणातून नांदेडकडे भरधाव वेगात जाणाऱ्या (एपी ०७ टीजी २२५९) क्रमांकाच्या ट्रकने जोराची धडक दिली. या धडकेत तालुक्यातील रायखोड येथील ऑटोत बसलेल्या प्रवाशी महिला कौशल्याबाई लक्ष्मण कोईलवाड (वय ५०) ह्या जागीच ठार झाल्या. तर त्यांचे पती लक्ष्मण कोईलवाड व चालक बाळू मारोती बुद्देवाड प्रवाशी हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

जखमींवर भोकर ग्रामीण रुग्णालय येथे उपचार करून त्यांना अधिक उपचारासाठी नांदेड येथे पाठविण्यात आले आहे. अपघात संदर्भाने भोकर पोलिसांत गून्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू असून पोलीस उपनिरीक्षक अनिल कांबळे हे पुढील तपास करीत आहेत. ट्रॅक चालक अपघात ठिकाणी ट्रक सोडून पसार झाला आहे.

भोकर शहरासह तालुक्यातील नागरिकांनी येथील राष्ट्रीय महामार्ग उपविभाग (विशेष) भोकर यांना अनेक वेळा निवेदने देवुनही, याठिकाणी गतिरोधक बसविण्यात आलेले नाही. परिणामी या विभागातील अधिकाऱ्यांचा बेजबाबदारपणामुळे सदरील चौकात अपघाताची मालिका गेल्या काही काळापासून सुरू आहे. ह्या चौकात मागील चार वर्षांत अनेक लोकांचे नाहक बळी गेल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळ उमरी बायपास रोडवर तूर्तास गतिरोधक बसविण्यात यावा, तसेच या रस्त्यावर उड्डाणपूल करावा अशी मागणी तालुक्यातील नागरिकांतून केली जात आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,790FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles

error: Content is protected !!