Tuesday, December 3, 2024

मयत महिलेच्या नावे बनावट स्त्री उभी केली; प्लॉटच्या मूळ मालकाची फसवणूक करणाऱ्या दहा जणांविरूद्ध गुन्हा दाखल

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड- मयत महिलेच्या ठिकाणी बनावट स्त्री उभी करून प्लॉटची विक्री करणाऱ्या दहा जणांविरुद्ध भाग्यनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही तक्रार दाखल होताच आरोपी पसार झाले आहेत.

धुळे शहरातील प्रकाशगृह सोसायटी देवपूर, जयहिंद कॉलनी येथे राहणारे सेवानिवृत्त एकनाथ वसंतराव बडगुजर यांच्या पत्नीच्या नावे नांदेड शहरातील भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्लॉट होता. प्लॉट खरेदीनंतर काही काळाने त्यांच्या पत्नीचे निधन झाले. परंतु मयत झालेल्या लता एकनाथ बडगुजर यांच्या जागी बनावट स्त्री उभी करून विक्री खत क्रमांक 83 63/ 2020, क्रमांक 835/ 20२1 बनावट विक्रीखत, मृत्यू प्रमाणपत्र, आधार कार्ड व इतर बनावट कागदपत्रे बनवून बनवाबनवी करीत प्लॉट विक्री करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे.

हा सर्व प्रकार नांदेड न्यायालयात गेल्यानंतर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी (आठवे) यांनी या प्रकरणात सविस्तर पाहणी करून अखेर भाग्यनगर पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. न्यायालयाच्या आदेशावरून भाग्यनगरचे पोलीस निरीक्षक सुधाकर आडे यांनी गुन्हा दाखल केला.

याप्रकरणी धीरज बाळू वाघमारे (वय 35, राहणार कल्याणनगर तरोडा बु.,) विवेक विठ्ठलराव इंगळे (वय 28, राहणार सादोळा तालुका जिल्हा बीड), राधिका रुपेश साखरे (वय 24 राहणार आलेगाव पोस्ट कावलगाव तालुका पूर्णा), दामोदर प्रकाश वानखेडे (वय 34, राहणार मेंढला खुर्द तालुका अर्धापूर), सुमन व्यंकट काकरे (वय 49, राहणार साफल्यनगर मारुती मंदिरामागे पावडेवाडी बुद्रुक नांदेड), व्यंकटराव मारोती नरवाडे वय 42, माणिकनगर नांदेड), रामा व्यंकट काकरे (वय 37, सफल्यानगर मारुती मंदिर पावडेवाडी) देविदास बंडेवार (वय ५६, राहणार फरांदेनगर नांदेड) मनीषा बापूराव अन्नमवार (वय 50, नांदेड) आणि रामा वेंकट काकरे (वय 37, राहणार साफल्यनगर मारुती मंदिरमागे पावडेवाडी) यांचा समावेश आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक प्रशांत जाधव करत आहेत.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!