Wednesday, February 1, 2023

मराठवाड्यातील सर्वात जुने दैनिक ‘गोदातीर समाचार’चे ६२ व्या वर्षात पदार्पण; मान्यवरांच्या उपस्थितीत आज वर्धापन दिन अंक आणि दिनदर्शिकेचे प्रकाशन

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड– मराठवाड्यातील सर्वात जुने दैनिक “गोदातीर समाचार” आज रविवार दि. ०१ जानेवारी २०२३ रोजी प्रकाशनाची ६१ वर्षे पूर्ण करून ६२ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. त्यानिमित्त काढण्यात आलेल्या विशेष पुरवणीचे आणि गोदातीर समाचारच्या २०२३ सालच्या दिनदर्शिकेच्या प्रकाशनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, हिंगोली-नांदेडचे खासदार हेमंत पाटील यांच्या हस्ते तसेच आमदार मोहनराव हंबर्डे, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या उपस्थितीत हा प्रकाशन सोहळा होणार आहे.

दैनिक गोदातीर समाचार कार्यालय, शिवाजीनगर, नांदेड येथे आज रविवार, दि. ०१ जानेवारी रोजी सकाळी ११.४५ वाजता आयोजित या कार्यक्रमास आपण आवर्जून उपस्थित राहावे, अशी विनंती दै. गोदातीर समाचारचे मुख्य संपादक तथा प्रकाशक केशव घोणसे पाटील आणि संपूर्ण ‘गोदातीर समाचार’ परिवाराच्यावतीने करण्यात आली आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,691FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles

error: Content is protected !!