Friday, June 9, 2023

महात्मा फुले शाळेच्या एनसीसी कॅडेट्सनी आकाशात भरारी घेत पार पाडली को-पायलटची जबाबदारी

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड– राष्ट्रीय छात्र सेना वायुदलच्या वतीने महात्मा फुले हायस्कूलचे 3 एनसीसी कॅडेट्सना एनडीए खडकवासला पुणे येथे दि. 22 रोजी आकाशात भरारी घेत को-पायलट म्हणून जबाबदारी पार पडण्याची संधी मिळाली. राष्ट्रीय छात्र सेना वायुदल महात्मा फुले हायस्कूलच्या वतीने पुणे येथे एनसीसीच्या एक दिवसीय कॅम्पसाठी हे तीन कॅडेट्स गेले आहेत.

येथील शारदा भवन शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले हायस्कूल येथील एनसीसी एअर विंग ट्रप असल्याकारणाने विद्यार्थ्यांच्या मनात देशप्रेम, राष्ट्रीय भावना निर्माण करण्यासाठी तसेच राष्ट्रीय संरक्षण दलात भरती होण्याची आवड निर्माण व्हावी म्हणून त्यांना विविध माध्यमातून प्रेरित केले जाते. मंगळवारी एनसीसीचे तीन कॅडेट ओमकार सोळंके, शुभांगी डोणगावकर, कृष्णा देशमुख या कॅडेट्सना छात्रसेना अधिकारी दत्ता बारसे यांच्यासोबत महा.एअर. स्क्वा. कमांड अधिकारी ग्रुप कॅप्टन रमेश जाधव यांच्या समवेत एअर क्राप्टमध्ये आकाश भरारी घेण्याची संधी प्राप्त झाली. कमांड अधिकार्‍यांसोबत को-पायलट म्हणून या तीन कॅडेट्सनी यशस्वीरित्या जबाबदारी पार पाडली.

या एकदिवसीय कॅम्पसाठी महत्त्वाची प्रेरणा देण्याचे कार्य महात्मा फुले हायस्कूलचे मुख्याध्यापक संजीवकुमार तायडे, व उपमुख्याध्यापिका एस. आर. कदम, तसेच सुपरवायझर बी. एस. शिंदे, तसेच सुपरवायझर शिंदे यांनी पार पाडत विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन केले. तसेच महात्मा फुले शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे प्रोत्साहन ही महत्त्वपूर्ण आहे. या कार्यासाठी, शारदा भवन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण, उपाध्यक्षा माजी आ. अमिता चव्हाण, सचिव माजी मंत्री डी. पी. सावंत, सहसचिव उदयराव निंबाळकर, खजिनदार रावसाहेब शेंदारकर आदींनी शुभेच्छा दिल्या.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,803FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles

error: Content is protected !!