Sunday, June 16, 2024

महापालिकेतील ५०० सफाई कामगारांचा आहेर देत सन्मान; लातूरमध्ये द्वारकादास शामकुमार आणि तुकाराम पाटील मित्रमंडळाचा स्तुत्य उपक्रम

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

लातूर– कोरोना काळात अविरत सेवा देणाऱ्या लातूर महापालिकेतील ५०० सफाई कामगारांचा अनोखा सन्मान नुकताच लातूरमध्ये मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. ज्यात ४५० हुन अधिक महिला कर्मचाऱ्यांना साडी-चोळी, प्रमाणपत्र तर पुरुष सफाई कामगारांना भरपेहराव देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. द्वारकादास शामकुमार ग्रुप आणि तुकाराम पाटील मित्रमंडळाच्यावतीने या अनोख्या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
लातूरच्या अंबाजोगाई रोड वरील द्वारकादास शामकुमारच्या दालनात हा सोहळा पार पडला.  यावेळी यावेळी जिल्ह्यातील ३५० रक्तदात्यांनी रक्तदान केलं. रक्तदान ३५० जणांचा एक लाख रुपयांचा अपघाती विमा उतरवून त्यांना संसारउपयोगी वस्तू भेट म्हणून देण्यात आली. तुकाराम जाधव पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हे उपक्रम घेण्यात आले. यावेळी ह.भ.प. गुरुबाबा महाराज औसेकर, अहमदपूरचे आ. बाबासाहेब पाटील, लातूरचे प्रथम नागरिक महापौर विक्रांत गोजमगुंडे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, सुप्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉ. विठ्ठल लहाने, डॉ. संतोष डोपे, डॉ. अशोक पोद्दार, डॉ कल्याण बरमदे, डॉ. सुधीर फत्तेपूरकर, डॉ. चांद पटेल यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

कोरोना काळात घर संसार सांभाळून, जीवाची पर्वा न करता महिला सफाई कामगारांनी योगदान दिल्यामुळे हा उपक्रम आयोजित केल्याचे यावेळी सांगण्यात आले. तर कोरोना काळात मृत पडलेल्यांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या मनपा कर्मचाऱ्यांना भर पेहराव देऊन गौरविण्यात आले. तर उर्वरित सफाई इतक्या मोठ्या प्रमाणात सफाई कामगारांचा सन्मान करण्याची बहुधा ही राज्यातील पहिलीच वेळ. याप्रसंगी झाडे लावा झाडे जगवा असा संदेश देणाऱ्या लातूर शहरातील ग्रीन लातूर टीमच्या सदस्यांचाही सत्कार करण्यात आला.

यावेळी द्वारकादास शामकुमारचे तुकाराम जाधव पाटील, राजाभाऊ भाऊ पाटील, सदाशिव पाटील, बाबुराव जाधव, राम बोरगावकर, रमेश बिरादार, सोनू डगवाले, योगेश करवा.  प्रा. शिवराज मोटेगावकर, निलेश राजेमाने, सच्चीदानंद ढगे, विवेकानंद ढगे, ऍड. दासराव शिरुरे, डी.एस. पाटील, विवेक सौताडेकर, पत्रकार शशिकांत पाटील, इस्माईल शेख, शहाजी पवार, उत्तम शेळके, असिफ शेख, डॉ. शशिकिरण भिकाने, रवी सूर्यवंशी, अनंत सूर्यवंशी यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!