Tuesday, December 3, 2024

महापालिकेसमोर भाजपचे कंदील आंदोलन; पथदिवे सुरू झाल्यानंतरही केले आंदोलन

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड– महानगरपालिका परिसरातील पथदिवे मागील दहा दिवसांपासून बंद होते. पालकमंत्र्यांनी अखेर यात लक्ष घातल्याने महावितरण कंपनीला एक कोटी रुपये देण्याचे ठरल्याने काल रविवारी दि. 6 रोजीच्या रात्रीपासून दिवाबत्ती (स्ट्रीट लाइट) सुरू करण्यात आले आहेत. तरीही भाजपने जाहीर केलेले नियोजित कंदील आंदोलन आज महानगरपालिकेसमोर केले.

नांदेड शहराचा चौफेर विस्तार झालेला आहे. त्यामुळे विस्तीर्ण अशा नांदेड शहरातच काय पण कोणत्याही शहरात पथदिव्यांशिवाय वावरणे अशक्य आहे. असे असताना गेली 10 दिवस नांदेड शहरातील पथदिवे बंद असल्यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. महिला, युवा, वयोवृद्ध घराबाहेर पडले तर चोरीचे प्रमाण वाढले होते. मोठ्या प्रमाणावर दुचाकी गाड्यांच्या चोऱ्या होत आहेत. नशा- पाणी करणारे युवक रस्त्याच्या दुतर्फा मद्यपान करत असतात, त्यांच्यासाठी तर पोषक असे वातावरण बनले होते.

नैसर्गिक आपत्तीमुळे आधीच नागरिक हैराण असतात अशातच पथदिवे बंद करण्यात आले. वीज बिल भरणा करण्याबाबतीत आधी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या विजेचे पंप बंद पाडले. जबरदस्ती वीजबील भरणा करून घेतला, आता शहरी भागात साठ टक्के पेक्षा जास्त मालमत्ताधारक कर भरत असताना पथदिवे बंद का आहेत? याचा खुलासा करावा व पथदिवे तात्काळ चालू करावेत असा इशारा भाजपने पत्रकाद्वारे देत कंदील मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार आज दि. 7 मार्च रोजी खा. प्रतापराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपचे महानगर अध्यक्ष प्रवीण साले यांच्या नेतृत्वात कंदील आंदोलन करण्यात आले.

काल रविवारी दि. 6 रोजीच्या रात्रीपासून पथदिवे (स्ट्रीट लाइट) सुरू झाल्याने भाजपची या आंदोलनाबाबत तशी कोंडी झाली होती. पण पथदिवे सुरू झाले तरीही भाजपने जाहीर केलेले नियोजित कंदील आंदोलन आज महापालिकेसमोर करण्यात आले.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!