Saturday, April 20, 2024

महामार्ग पोलीस चौकीजवळ उभ्या असलेल्या ट्रकवर मोटारसायकल धडकली; युवक जागीच ठार, एक गंभीर

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड- मुदखेड तालुक्यातील बारड महामार्ग पोलीस चौकीसमोर उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकी धडकल्याने दुचाकीवरील एक युवक ठार झाला, तर एक युवक गंभीर जखमी झाला आहे. जखमीला शासकीय रुग्णालय येथे दाखल करण्यात आले आहे. ही घटना आज गुरुवार दिनांक 29 सप्टेंबर रोजी रात्री आठच्या सुमारास घडली.

महामार्ग पोलीस मदत केंद्र बारड येथून 50 मीटर अंतरावर बारड गावाकडे जाणाऱ्या महामार्गावर (NH 61) गंभीर अपघात झालेला आहे. भरधाव वेगात बारडकडे निघालेली दुचाकी उभ्या असलेल्या ट्रकवर जोरदारपणे धडकली. या धडकेत दुचाकीवरील एक युवक ठार तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे.

दोन्ही अपघातग्रस्त युवकांना शासकीय रुग्णालय विष्णुपुरी नांदेड येथे रवाना करण्यात आले आहे. अपघातानंतर बारड ते भोकर रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. महामार्ग पोलिसांनी वाहतूक सुरळीत केल्याचे पोलीस उपनिरीक्षक राजेश यलगुलवार यांनी सांगितले. हे वृत्त लिहीपर्यंत मयत व जखमीची ओळख पटली नव्हती.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]

Latest Articles

error: Content is protected !!