ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड/ अर्धापूर– अर्धापूर तालुक्यातील मालेगाव येथील शेतकरी सुभाशिष कामेवार यांच्या शेतात गहु मळणी सुरू असताना विजेचा प्रवाह कमी ज्यास्त झाल्यामुळे स्पार्कींग होऊन मळणी यंत्रासह दोन एकर गहु व गव्हाच्या शेताशेजारी रमेश कामेवार, चंद्रकांत कामेवार यांचा आठ एकर ऊस जळुन खाक झाला आहे.
सातत्याने महावितरण कमी दाबाचा विद्युत पुरवठा करते. तसेच वर्षानुवर्षांपासून रोहीत्रा(डीपी)पासुन शेतकर्यांच्या खांबापर्यंत विद्युत वाहक तारा तुटलेल्या अवस्थेत आहेत. त्याची दुरूस्ती महावितरण करत नाही; परंतू विज बिल भरण्यासाठी मात्र महावितरण शेतकर्याना तगादा लावते. महावितरणने देखभाल दुरुस्ती वेळेवर न केल्यामुळे शेतकऱ्यांचे सतत असे नुकसान होत आले आहे. महावितरणने याची जबाबदारी घेऊन नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी सुभाशिष कामेवार यांनी केली आहे. तलाठी पाटील यांनी घटनास्थळावर जाऊन पंचनामा केला आहे. पुढील प्रस्ताव महावितरण कडे पाठवणार असल्याचे सांगितले.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻