Friday, July 19, 2024

माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकुरकर यांच्या घरी त्यांच्या चुलत भावाची गोळी झाड़ून आत्महत्या; लातूरमधील घटनेने खळबळ

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

लातूर- काँग्रेसचे जेष्ठ नेते तथा माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकुरकर यांचे चुलत भाऊ चंद्रशेखर उर्फ हणमंत पाटील चाकूरकर (वय ८१) यांनी स्वतःच्या बंदुकीतून गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकुरकर यांच्या लातूर येथील ‘देवघर’ या निवासस्थानी त्यांनी आत्महत्या केली आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

आज दि. ५ मार्च रोजी सकाळी ०९ ते १० च्या सुमारास ही घटना औसा रोड भागाच्या बसवेश्वर कॉलनीतील ‘देवघर’ येथील घरी घडली. ८१ वर्षीय चंद्रशेखर पाटील चाकूरकर यांचे घर ही ‘देवघर’ जवळील हरी हेरिटेज या अपार्टमेंट आहे. ते नेहमी सकाळी फिरून आल्यानंतर आपले चुलत बंधू माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या घरी ‘देवघर’ येथे येऊन चहा पिऊन पेपर वाचत असत. नेहमीप्रमाणे ते आजही आले. यावेळी शिवराज पाटील यांचे पुत्र शैलेश पाटील चाकूरकर यांनी त्यांना चहा घ्या, मी फ्रेश होऊन येतो असे सांगून ते गेले. मात्र थोड्यावेळात मोठा आवाज झाल्याने ते धावत पळत आले. त्यावेळी ‘देवघर’ येथील हॉल मध्ये बसलेले चंद्रशेखर पाटील चाकूरकर यांनी स्वतःच्या परवाना असलेल्या रिव्हॉल्वरमधून कानशिलाजवळ गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली होती. ते रक्ताच्या थारोळ्यात पडले होते.

या धक्कादायक घटनेनंतर तात्काळ पोलिसांना पाचारण करण्यात आले. सोबत फॉरेंसिक टीम ला देखील पोलिसांनी घटनास्थळी पाचारण केले. या टीमने अनेक नमूने घेतले आहेत. पोलिसांनीही स्थळ पंचनामा केला आहे. या सर्व प्रक्रियेनंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. मयत चंद्रशेखर उर्फ हणमंत पाटील हे माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकुरकर यांचे चुलत बंधु होते. ते लातूरमध्ये त्यांच्या धाकटे चिरंजीव ऍड. लिंगराज पाटील यांच्याकडे राहत होते. या घटनेची माहिती ऍड. लिंगराज पाटील यांनीच दिल्याचे शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांनी दै. गोदातीर समाचार ला दिली. याप्रकरणी लातूरचे शिवाजीनगर पोलीस हे अधिक तपास करीत आहेत.

मयत चंद्रशेखर पाटील चाकूरकर यांना वाढत्या वयासोबत अनेक शारीरिक आजार देखील जडले होते. काही दिवसांपूर्वी त्यांची बायपास शस्त्रक्रिया ही झाली होती. कदाचित सततच्या आजारपणाला कंटाळुनच त्यांनी हे पाऊल उचललं असावं असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकुरकर हे दिल्ली येथे असल्याचे सांगण्यात आले. मयत चंद्रशेखर पाटील चाकूरकर यांच्या पश्चात दोन विवाहित मुली तसेच दोन मुलं आहेत. दोन्ही मुलं ही वकील आहेत. दरम्यान या घटनेमुळे लातूरमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!