ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड /लोहा- सुट्टीवर आलेल्या सैनिकाने गरोदर पत्नीचा आणि चार वर्षे चिमुकलीचा गळा दाबून खून केल्याची घटना कंधार तालुक्यातील बोरी येथे आज बुधवार दि. १३ सप्टेंबर रोजी घडली. विशेष म्हणजे मारेकरी सैनिक स्वतःहून माळाकोळी पोलीस ठाण्यात हजर झाला.
कंधार तालुक्यातील बोरी येथील एकनाथ मारुती जायभाये (वय ३२) हा सैन्य दलामध्ये राजस्थान मधील बिकानेर येथे कर्तव्य बजावत होता. मागील चार दिवसांपासून तो सुट्टीवर गावी आला. तीन दिवस परिवारासोबत आनंदाने राहिला. चार वर्षीय चिमुकलीला अंगा- खांद्यावर खेळवले. पत्नीशी नीट वागला. मात्र, आज बुधवार दिनांक १३ सप्टेंबर रोजी पहाटे सहा वाजताच्या सुमारास आठ महिन्याची गर्भवती असलेली पत्नी भाग्यश्री (वय २५) आणि मुलगी सरस्वती (वय ४) यांचा त्याने गळा दाबून खून केला. त्यानंतर तो स्वतःहून माळाकोळी पोलीस ठाण्यात हजर झाला. त्याने घडलेला प्रकार सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय निलपत्रेवार यांना सांगितला. चारित्र्याच्या संशयावरून हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे.
निलपत्रेवार यांनी लगेच आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना ही माहिती देऊन घटनास्थळ गाठले. तोपर्यंत घटनास्थळाला उपविभागीय पोलीस अधिकारी मारुती थोरात, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी भेट दिली. या प्रकरणात माळाकोळी पोलीस ठाण्यात मयत महिलेचे नातेवाईकांकडून तक्रार देण्यात येत आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
