ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड – आमच्या पराभवासाठी भोकर मतदारसंघात येऊन सगळीकडे बोंबलत फिरले. ज्यांनी ज्यांनी मला त्रास दिला, ते सर्व काँग्रेस नेते या विधानसभा निवडणुकीत साफ झाले अशा जहाळ शब्दात माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे राज्यसभा खासदार अशोकराव चव्हाण यांनी काँग्रेस नेत्यांवर हल्लाबोल केला आहे.
नांदेड जिल्ह्यातील भोकर विधानसभा मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री, भाजपचे खासदार अशोकराव चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला आहे. भोकरची ही निवडणूक खासदार अशोकराव चव्हाण यांच्यासाठी राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठेचे आणि एक प्रकारे अस्तित्वाची बनली होती. या मतदारसंघात श्रीजया चव्हाण यांचा पराभव करून खा. अशोकराव चव्हाण यांच्या राजकीय वर्चस्वाल सुरुंग लावण्याचा जणू काँग्रेस नेत्यांनी चंग बांधला होता. यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री लातूरचे काँग्रेस आमदार अमित देशमुख यांच्यासह बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण हे आघाडीवर होते.
भोकर विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळविल्यानंतर आज रविवारी अशोकराव चव्हाण यांनी या मतदारसंघातील भोकर, मुदखेड, अर्धापूर या तालुक्यांमध्ये मतदारांचे आभार मानणारा दौरा केला, यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेस नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे आमच्या भोकर विधानसभा मतदारसंघात येऊन सर्वत्र बोंबलत फिरले! मात्र त्यांची काय अवस्था झाली? ते त्यांच्याच मतदारसंघात कसेबसे दीडशे मतांनी निवडून आले. दुसरे शेजारच्या लातूरचे नेते, एक धडपडत कसेबसे निवडून आले, पण पण दुसरे पडलेच! आणि हे म्हण राज्याचे नेतृत्व करणार! अशा जहाळ शब्दात माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी नाना पटोले आणि अमित देशमुख यांच्यावर हल्लाबोल चढविला. राज्याचे महसूल मंत्री राहिलेले बाळासाहेब थोरात आणि मुख्यमंत्रीपद भूषविलेले पृथ्वीराज चव्हाण यांना त्यांचा मतदारसंघ न टिकवता पराभव पत्करावा लागला, अशी टीकाही यावेळी खासदार अशोकराव चव्हाण यांनी केली.
मतदारांच्या या आभार दौऱ्यात खासदार अशोकराव चव्हाण यांच्या समवेत त्यांच्या कन्या नवनिर्वाचित आमदार श्रीजया चव्हाण, जेष्ठ नेते धर्मराज देशमुख, भाजप जिल्हाध्यक्ष ॲड किशोर देशमुख, कृऊबाचे सभापती संजयराव देशमुख, माजी सभापती शामराव पाटील, संचालक गोविंदराव शिंदे, भाजप तालुकाध्यक्ष डॉ लक्ष्मणराव इंगोले, उपजिल्हाप्रमुख दत्ता पाटील पांगरिकर, माजी सभापती किशोर स्वामी, नगराध्यक्ष छत्रपती कानोडे, माजी तालुकाध्यक्ष बालाजीराव गव्हाणे, माजी उपनगराध्यक्ष राजेश्वर शेटे, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर कदम, तालुकाप्रमुख संतोष कपाटे, भाऊरावचे व्हाईस चेअरमन नरेंद्र चव्हाण यांच्यासह भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
तत्पूर्वी, बसवेश्वर चौकात जेसीबीने फुले उधळून भाजपच्यावतीने जंगी सत्कार करण्यात आले. यावेळी संचालक निळकंठराव मदने, माजी सभापती आनंदराव कपाटे, नवनाथ कपाटे, ता.सरचिटणिस प्रल्हादराव माटे, शहरप्रमुख सचिन येवले, माजी सरपंच इंगळे, सोशल मीडियाचे राजू बारसे, डॉ.विशाल लंगडे, गटनेते बाबुराव लंगडे, अजय देशमुख, सुरज माढे, राजू निकम, गुरुराज रणखांब, शहरप्रमुख सचिन येवले, माजी नगरसेवक तूकाराम साखरे, विलास साबळे, व्यंकटराव साखरे, सोनाजी सरोदे, जठन मुळे, योगेश हाळदे, तुळशीराम बंडाळे, उमेश सरोदे, तुकाराम माटे, सौ.वर्षा बंडाळे, सौ.प्रविणा डाके यांच्यासह शहर आणि ग्रामीण भागातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻