Wednesday, December 4, 2024

नांदेडहून पनवेलसाठी सुट्ट्यांदरम्यान आणखी एक रेल्वे गाडी; छत्रपती संभाजीनगर, कल्याणमार्गे धावणार

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड– उन्हाळी सुट्यात होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेवून दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने नांदेड- पनवेल- नांदेड विशेष गाडीच्या 40 फेऱ्या मंजूर केल्या आहेत. यामुळे नांदेडहून पनवेलसाठी सुट्ट्यांदरम्यान आणखी एक रेल्वे गाडी मिळाली असून ही गाडी छत्रपती संभाजीनगर, कल्याणमार्गे धावणार आहे.

नांदेड- पनवेल द्वि- साप्ताहिक विशेष गाडीच्या 20 फेऱ्या: गाडी क्रमांक 07625 हुजूर साहिब नांदेड ते पनवेल विशेष गाडी दिनांक 22 एप्रिल ते 26 जूनदरम्यान दर सोमवारी आणि बुधवारी नांदेड रेल्वे स्थानकावरून रात्री 23.00 वाजता सुटेल. आणि परभणी, मानवत, सेलू, परतूर, जालना, औरंगाबाद, लासुर, रोटेगाव, नगरसोल, अंकाई, इगतपुरी, कल्याण मार्गे पनवेल येथे दुसऱ्या दिवशी दुपारी 12.40 वाजता पोहोचेल. ही गाडी एप्रिल, मे आणि जून महिन्यात मिळून 20 फेऱ्या पूर्ण करेल.

पनवेल- नांदेड द्वि- साप्ताहिक विशेष गाडीच्या 20 फेऱ्या: गाडी क्रमांक 07626 हुजूर साहिब नांदेड ते पनवेल विशेष गाडी दिनांक 23 एप्रिल ते 27 जून दरम्यान दर मंगळवारी आणि गुरुवारी पनवेल रेल्वे स्थानकावरून दुपारी 14.30 वाजता सुटेल आणि कल्याण, इगतपुरी, अंकाई, नगरसोल , रोटेगाव, लासुर, औरंगाबाद, जालना, परतूर, सेलू, मानवत, परभणी मार्गे हुजूर साहिब नांदेड येथे दुसऱ्या दिवशी सकाळी 4.30 वाजता पोहोचेल. ही गाडी एप्रिल, मे आणि जून महिन्यात मिळून 20 फेऱ्या पूर्ण करेल. या गाडीत वातानुकूलित आणि स्लीपर मिळून 22 डब्बे असतील.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!