Sunday, October 6, 2024

माहूरमध्ये देवदर्शन घेऊन एका दुकानात झोपलेल्या माय लेकीला कारने चिरडले; लेक जागीच ठार

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

श्री देवदेवेश्वर मंदिराजवळील घटना

श्री क्षेत्र माहूर (जि. नांदेड)- येथे देवदर्शनासाठी आलेल्या हदगाव येथील मायलेकींना चारचाकी वाहनाने चिरडल्याची घटना घडली असून यात लेकीचा जागीच मृत्यू झाला आहे. तर आई गंभीर अवस्थेत माहूरच्या ग्रामीण रूग्णालयात उपचार घेत आहे.

आज दि. १२ मे रोजी पहाटे तीन ते साडेतीन वाजताच्या दरम्यान श्रीक्षेत्र माहूर येथील श्री देवदेवेश्वर मंदिर जवळील एका दुकानात झोपलेल्या मायलेकीला इंडिका कारने चिरडले. त्यात लेकीचा जागीच मृत्यू झाला असून आई गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.

अपघातग्रस्त मायलेकी हदगाव तालुक्यातील मौजे करोडी येेेथील रहिवासी असून लक्ष्मीबाई शिवराम खंदारे (वय ७० वर्षे) व त्यांची मुलगी शिला आनंदराव इनकर (वय ४८ वर्षे) या दोघी मागील सहा दिवसांपूर्वी देवदर्शनासाठी देवदेवेश्वरी मंदिराजवळ जवळ माहूरात आल्या होत्या. दरम्यान माहूरातील श्री देवदेवेश्वर मंदीराजवळील एका दुकानात दि.११ मे च्या रात्री त्या झोपल्या होत्या. त्यावेळी पहाटे साडेतीनच्या सुमारास ‘एम.एच.४४ जी ०३७५’ क्रमांकाच्या “टाटा इंडिका विस्टा” या कारच्या चालकाने निष्काळजीपणे गाडी मागे घेताना, गाडी शिला आनंदराव ईनकर यांच्या अंगावरून गेली. त्यात शिला ह्या जागीच ठार झाल्या. तर लक्ष्मीबाई शिवराम खंदारे यांचे मनगट, गुडघा व खांद्यावरून गाडीचे चाक गेल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली आहे.

याप्रकरणी माहूर पोलीस ठाण्याच्या गस्ती पथकाने मायलेकींना माहूरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. बोडखे यांनी जखमींची तपासणी केली असता शिला ईनकर ह्या मयत झाल्याचे त्यांनी घोषित केले. पोलिसांनी सदर वाहन ताब्यात घेतले असून वाहन चालक गुरनुले यासही ताब्यात घेतल्याची माहिती आहे.

या प्रकरणी माहूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक नामदेव रिठ्ठे यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. अण्णासाहेब पवार हे पुढील तपास करीत आहेत.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

1 COMMENT

  1. Youre so cool! I dont suppose Ive read anything like this before. So good to search out somebody with some unique ideas on this subject. realy thank you for starting this up. this web site is one thing that’s wanted on the web, somebody with slightly originality. useful job for bringing one thing new to the internet!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!