ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
• पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिली घटनास्थळाला भेट
माहूर (जि. नांदेड) – माहूर तालुक्यातील आष्टा फाट्याजवळ अज्ञात महिलेला जिवंत जाळून तिची हत्या करण्यात आल्याच्या घटना घडली आहे. घटनेआधी दुपारी मंदिरासमोर फोटो काढणाऱ्या एका महिलेमुळे गूढ निर्माण झाले आहे. दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिली घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली.
माहूर तालुक्यापासून अवघ्या पाच किलोमिटर अंतरावर तुळशीराम राठोड (हिवळनी) यांच्या शेतात ही घटना घडली असून वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. राष्ट्रीय महामार्गात लगत असलेल्या शेतात अज्ञात महिलेचे अर्धवट अवस्थेत जळालेले प्रेत दि.५ जुनच्या रात्री अंदाजे साडेनऊ वाजताच्या सुमारास आढळून आले. मृतदेहच्या हातात बांगड्या, कानातले आभूषण, अंगठी, पायात जोडवे असा ऐवज आढळून आला. याशिवाय ओळख पटण्यासारखा पुरावा घटना स्थळावर आढळून आला नाही.
मृतदेह असलेली महिला ही जवळपासची नसल्याचे प्रथमदर्शनी सांगण्यात येत आहे. जवळच्याच गावातील लोकांचे म्हणण्यानुसार, ही महिला दुपारी मंदिरावर फोटो काढत असल्याचे सांगण्यात येते. या घटनेने माहुर तालुक्यात खळबळ उडाली असून नेमके या जळीतकांड घडविण्याचे मागचे रहस्य काय ? सदरील महिला कोण ? याचा छडा लावण्याचे माहुर पोलिसांपुढे आव्हान उभे आहे.
माहूर- किनवट या राष्ट्रीय महामार्गावरील नखेगाव आष्टा फाटा दरम्यान असलेल्या राठोड यांच्या शेतातील विहीरी जवळ जळतंन जमा करून ठेवले होते. त्या जळतणात दि. ५ जुनच्या रात्री अंदाजे साडेनऊ वाजताच्या सुमारास अर्धवट जळालेल्या अवस्थेत या अज्ञात महिलेचे प्रेत पडुन असल्याची घटना उघडकीस आली. त्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. खंडेराय धरणे, उपविभागीय पोलिस अधिकारी रामकृष्ण मळघने, माहुर पोलिस स्टेशनचे ठाणेदार शिवप्रकाश मुळे, सिंदखेड पोलिस स्टेशनचे ठाणेदार सुशांत किनगे व पोलिस कर्मचारी यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तातडीने घटनास्थळी रवाना होत तपासणी केली.
सदर घटनेची नोंद पोलिस स्टेशन माहुर येथे करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांनीही घटनास्थळाला भेट दिली आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻