Sunday, October 6, 2024

मित्रांनीच केला मित्राचा खून; मृतदेह जाळून हाडे गोदावरी नदीत फेकली

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

● नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल; एकास अटक

नांदेड– पाच मित्रांनी मिळून आपल्याच एका मित्राचा खून केल्याची घटना नांदेडमध्ये उघडकीस आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे खून केल्यानंतर त्या मित्राचा मृतदेह परस्पर जाळून टाकून त्याची हाडे गोदावरी नदीत फेकून देण्यात आली. याप्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला अटक करण्यात आली आहे.

मागच्या एक महिनाभरापासून गायब असलेल्या एका युवकाचा खून करून त्याच्या प्रेताची विल्हेवाट लावणाऱ्या या पाच मित्रांविरुद्ध नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी एका अल्पवयीन युवकास ग्रामीण पोलिसांनी आज रविवारी सकाळी ताब्यात घेतले असून त्याला बाल निरिक्षणगृहात ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. या प्रकरणाचा पोलीस कसून तपास करीत आहे.

शहरातील वजिराबाद पोलिस ठाण्यात दिनांक 21 जानेवारी रोजी कस्तुरीबाई सुलगेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचा नातू सुनील सुरेश सुलगेकर (वय 21) हा कोणाला काहीही न सांगता बेपत्ता झाला होता. वजिराबाद पोलिसांनी याबाबत मिसींगची तक्रार दाखल करून घेतली होती.

दरम्यान शनिवार दिनांक 22 जानेवारी रोजी व्यंकटेश राजू सुलगेकर (राहणार बंदाघाट रस्ता नांदेड) यांनी नांदेड ग्रामीण पोलीस ठाणे येथे हजर होऊन जवाब लिहून दिला आहे की, त्याचा चुलत भाऊ सुनील सुरेश सुलगेकर हा मला दिनांक 18 डिसेंबर रोजी भेटला होता. सुनीलचे वडील सुरेश सुलगेकरचा 2018 मध्ये शिवाजीनगर भागात खून झाला. त्याच्या आईचा मृत्यू आजाराने झाला आहे. सुनील मोठा झाल्यावर त्याला वाईट व्यसनाची सवय लागली. त्याचे मित्र अनिरुद्ध आंचेवार, सोनू, अभिजित पुजारी, अनिल पवार हे आहेत. यापैकी दोघांसोबत सुनीलचे संबंध बिघडले होते. त्यातूनच त्यांचे एकमेकांशी वाद होत गेले. आणि त्यातूनच पाच जणांनी मिळून दि. 18 डिसेंबर रोजी कौठा परिसरात सुनील सुलगेकरचा खून केला होता. तसेच त्याचा मृतदेह जाळून त्याची हाडे गोदावरी नदीत टाकून दिली.

या तक्रारीवरून नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या सुचनेनुसार भादंवि कलम 302, 201, 34 नुसार पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक विजय पाटील करत आहेत.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!