Thursday, March 28, 2024

मिरची पावडर टाकून किराणा व्यापाऱ्याचे साडेचार लाख रुपये लुटले; दुचाकीही पळवली, नांदेडच्या कापुस संशोधन कार्यालय परिसरातील घटना

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नवीन नांदेड-  वाजेगाव येथील जनता किराणा दुकानचे होलसेल व्यापारी हे दररोजप्रमाणे दुकान बंद करून सिडकोकडे येत होते. ते ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धनेगाव कापुस संशोधन कार्यालयाजवळ आले असता दुचाकीवरून आलेल्या तिघांनी मिरची पावडर अंगावर टाकून त्यांच्याकडील साडेचार लाख रुपयांची रक्कम लुटली. तसेच व्यापाऱ्याची दुचाकी घेऊन चोरटे फरार झाले.

वाजेगाव येथील जनता किराणा दुकान मालक सय्यद अतिक सय्यद रशिद हे नेहमीप्रमाणे 15 मे रोजी रविवार बाजार असल्याने जमा झालेली चार लाख साठ हजार इतकी रक्कम रात्री नऊ वाजताच्या सुमारास बॅगमध्ये ठेवून एम.एच.26.ए.5498 या स्कुटीच्या डीक्कीमध्ये ठेवून रात्री सिडकोकडे निघाले होते. पाठीमागे त्यांचे भाऊ सय्यद आशेफ सय्यद रशिद हे मोटार सायकल घेऊन जात होते.

व्यापाऱ्याने दिलेल्या तक्रारीनुसार रात्री 10 वाजताच्या सुमारास कापुस संशोधन केंद्राच्या गेटसमोर एका मोटार सायकलवर आलेल्या तीन अनोळखी चोरट्यांनी स्कुटीला कट मारून स्कुटीसमोर त्यांची मोटारसायकल आडवी लावली. आणि अचानक लाल मिरची पावडर तोंडावर फेकली. यातील एकाच्या हातात तलवार होती, त्याच्या तलवारीची म्यान खाली पडली, तेवढ्यात भाऊ आला व त्याने त्याची मोटारसायकल तलवार फिरवणाऱ्याच्या अंगावर घातली. पण तो तलवार घेऊन अंगावर धावून आला आला त्या तिघांपैकी एकाने स्कुटीची चावी घेऊन रक्कम असलेली ती स्कुटी घेऊन तिथून पळाला.

या घटनेत त्या चोरट्याचा ओपो कंपनीचा मोबाईल घटनास्थळी पडला होता. तसेच घटनास्थळी तलवारीची म्यान, मोबाईल व मिरची पुड आढळून आली असून पोलीसांनी ती जप्त केली आहे. पँट, शर्ट असा पेहराव असलेल्या आरोपींनी तोंडावर कापड बांधले होते.

या प्रकरणी ग्रामीण पोलीस स्टेशन येथे सय्यद आतिक यांच्या फिर्यादीवरून ग्रामीण पोलीस स्टेशन येथे कलम 392,34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक महेश कोरे व अंमलदार सुनिल गटलेवार हे करीत आहेत.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]

Latest Articles

error: Content is protected !!