ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड- मुंबईमध्ये अवैधपणे हुक्का पार्लर चालविले जातात हे सर्वज्ञात आहे. पण आता नांदेड शहरातील 20 ते 25 वयोगटातील तरुणांना हुक्का पार्लरच्या आहारी घालून त्यांचे आयुष्य उध्वस्त करणारी टोळी शहराच्या इतवारा भागात सक्रिय झाली आहे. हुक्का पार्लरच्या माध्यमातून तरुणांना नशेच्या आहारी उतरून आपला गोरख धंदा करण्याचे काळे कारनामे सुरू आहेत. अशाच एका हुक्का पार्लरवर इतवारा पोलिसांनी कारवाई करून पाच जणांना अटक केली आहे. यावेळी पोलिसांनी हुक्का ओढण्याचे साहित्य जप्त केले आहे. ही कारवाई रात्री साडेनऊच्या सुमारास माळटेकडी परिसरात करण्यात आली.
शहराच्या इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मालटेकडी भागात विनापरवाना बेकायदेशीररित्या विशेष म्हणजे तरुणांना तंबाखूजन्य हुक्का फ्लेवर्सची विक्री करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक भगवान धबडगे यांना मिळाली. त्यांनी हुक्का पार्लर बाबत माहिती घेत अत्यंत गोपनीयता राखत आपल्या सहकाऱ्यांसोबत माळटेकडी परिसरात असलेल्या फुरखान यांच्या जागेवर धाड टाकून कारवाई केली.
या ठिकाणी तंबाखूजन्य हुक्का फ्लेवर विक्री करून खोलीतील किचनमध्ये शेगडीवरील पेटत्या निखाऱ्यामुळे एखाद्या आस्थापनांना आग लागण्याची व त्यामुळे मानवी जीवितास धोका होण्याचे प्रयत्न करताना आढळून आले. तर काही वीस ते पंचवीस वयोगटातील तरुण हुक्का ओढत असताना पोलिसांनी ताब्यात घेतले. साहित्य जप्त करून या हुक्का ओढणाऱ्या पाच जणांविरुद्ध पोलीस हवालदार एकनाथ मोकले यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात शहबाज खान राहणार लेबर कॉलनी, शेख तोहीद शेख अबूतालेब राहणार मंडई मज्जितजवळ चौफाळा, शेख सौरभअली उर्फ समीअली रफिक अली राहणार मंडई मजीदजवळ चौफाळा, शेख शेरीफुल शेख इस्माईल राहणार सयदान गल्ली सराफा बाजार आणि शेख मुनिअली इस्लाम शेख रमजानअली या पाच जणांचा समावेश आहे. तपास पोलीस हवालदार रसूल शेख करत आहेत.
इतवारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान धबडगेसह त्यांच्या सहकाऱ्यांचे पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक निलेश मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी (इतवारा) डॉ. सिद्धेश्वर भोरे यांनी कौतुक केले.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻