Wednesday, April 17, 2024

मुखेडचे माजी नगराध्यक्ष बाबुराव देबडवार यांच्यावर प्राणघातक हल्ला; हल्लेखोर सेवानिवृत्त सैनिक पोलिसांच्या ताब्यात

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड– मुखेड नगरीचे माजी नगराध्यक्ष तथा प्रतिष्ठित व्यापारी बाबुराव देबडवार आपल्या दुकानात बसले असता त्यांच्यावर एका सेवानिवृत्त सैनिकांनी प्राणघातक हल्ला केला. यात बाबुराव देबडवार जबर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आले आहे. दरम्यान आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुखेड नगरीचे माजी नगराध्यक्ष तथा शहरातील प्रतिष्ठित व्यापारी बाबुराव देबडवार हे शुक्रवार दि. दोन डिसेंबर रोजी आपल्या बसस्थानकासमोरील दुकानात बसले होते. सेवानिवृत्त सैनिक गजानन विश्वनाथ मदनवाड हे त्यांच्या दुकानात गेले व बाबू सावकार यांना उद्देशून तू माझ्या घराचे बांधकाम का अडवतोस, तू माझ्या विरोधात पोलीस तक्रार का दिलीस असा जाब विचारत काही कळण्याच्या आत त्यांच्या दुकानातील लोखंडी फावडे व त्याच्या लाकडी दांड्याने बाबू सावकार यांना जबर मारहाण केली. यात बाबुराव देबडवार यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

दरम्यान या हल्ल्यात मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या दुकानातील दोन कर्मचाऱ्यांनाही मार लागला असून त्यांना उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. बाबुराव देबडवार यांच्यावर प्रथमोपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आले आहे. दरम्यान पोलिसांनी आरोपी गजानन विश्वनाथ मदनवाड यांना ताब्यात घेतले असून त्यांच्या विरोधात कलम ३०७,३२४, ५०४, ५०६ भादवी  अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]

Latest Articles

error: Content is protected !!