Sunday, May 19, 2024

मुखेड तालुक्यात पुराच्या पाण्यात चालकासह जीप कोसळली, नागरिकांनी चालकाला कसेबसे वाचवले; घटना व्हिडिओत कैद

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

मुखेड (जि.नांदेड)- मुखेड तालुक्यात पुराच्या पाण्यात चालकासह जीप कोसळल्याचा धक्कादायक प्रकार घडला. नागरिकांनी तत्परता दाखवत चालकाला कसेबसे वाचवले. ही सर्व घटना व्हिडिओत कैद झाली आहे.

https://fb.watch/eIWf3x3Xfh/

जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मुखेड तालुक्यातील बाऱ्हाळीजवळील पुलावरून जाताना एक जीप पुलावरून खाली गेली. यात वाहनचालक वाहून जात असताना गावातील तरूणांनी पुराच्या पाण्यातून त्याला सुखरूप बाहेर काढले. जीप मात्र दगडांना अडकल्यामुळे जागीच थांबून राहिली. आज शुक्रवारी जीपलाही क्रेनच्या साह्याने बाहेर काढण्यात आले.

गुरूवारी सायंकाळी बाऱ्हाळी परिसरात मुसळधार पाऊस सुरू होता. कुंद्राळा मध्यम प्रकल्प १०० टक्के भरल्यामुळे थोडाही पाऊस झाला की नदीला पूर येत आहे. बा-हाळी  देगलूर मार्गावरील पुल छोटा असल्याने नेहमीच पुलावरून पाणी वाहत असते. कमलानगर तांडा येथील वाहनचालक अशोक राठोड हा घरी जाण्याच्या घाईत पुलावरील पाण्याचा अंदाज न घेताच रात्री साडेआठच्या सुमारास जीप ( एम.एच.२४ सी.३९४२) पुलावर नेली. तो पुलाच्या मध्यभागी पोहोचताच जीप अचानक बंद पडली. या दरम्यान नदीच्या पाण्यात वाढ सुरूच होती. त्यामुळे जीप वाहत पुलावरून नदीत कोसळली आणि ती पुलावरून दहा पंधरा मीटर अंतरावर दगडांना जाऊन अडकली. चालक तातडीने दार काढून कारच्या टपावर जाऊन बसला.

नदीला पूर आल्यामुळे अडकून पडलेले शेतकरी हा सगळा प्रकार पाहत होते. दरम्यान या घटनेची माहिती प्रशासनाला देण्यात आली. त्यानंतर तहसीलदार काशिनाथ पाटील, सपोनि संग्राम जाधव घटनास्थळी दाखल झाले. सेवा सोसायटीचे सदस्य व्यंकटराव पाटील , बंडू पाटील क्यादेव महाडिवाले व अन्य सहका-यांच्या मदतीने दोरखंडाच्या साह्याने रात्री अकराच्या सुमारास वाहन चालकाला सुखरूप बाहेर काढले.

बा-हाळी  देगलूर मार्गावरील या पुलाची ऊंची अत्यंत कमी असल्यामुळे मोठा पाऊस झाला की पुलावरून पाणी वाहते. त्यामुळे पावसाळ्यात नेहमीच वाहतूक विस्कळीत होते. वाहनचालक पुलावरून जाण्याचे धाडस करतात आणि मृत्यूला आमंत्रण देतात. या पुलाची ऊंची वाढविणे आवश्यक झाले असून बांधकाम विभागाकडून कार्यवाही होणे गरजेचे असल्याची अपेक्षा या भागातील नागरिकांनी व्यक्त केली.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]

Latest Articles

error: Content is protected !!