Tuesday, October 15, 2024

मुखेड तालुक्यात शेतात हळद शिजवताना कुकरचा स्फोट झाल्याने तरुण शेतकरी जागीच ठार

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

◆ पत्नी, 2 वर्षाच्या मुलासह मजूर जखमी

मुखेड (जि. नांदेड)- तालुक्यातील मौजे दापका गुंडोपंत येथे हळद शिजवताना कुकरचा स्फोट झाल्याने तरुण शेतकरी जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. यात या शेतकऱ्याची पत्नी आणि 2 वर्षाच्या मुलासहित अन्य एक मजूर जखमी झाला आहे.

हळद शिवजवताना कूकरमधून पाण्याची गळती होऊ लागली. हा नेमका काय प्रकार आहे, हे पाहण्यासाठी शेतकरी तरुण कुकरजवळ गेले, त्याचवेळी कूकरचा मोठा स्फोट झाला. हा स्फोट इतका मोठा होता की, कूकरचे तुकडे दूरपर्यंत फेकले गेले. यात या तरुण शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. दापका गुंडोपंत गावात ही दुर्दैवी घटना घडली.

कच्ची हळद शिजवताना कुकर मधून पाणी गळती होऊ लागली आणि त्याचवेळी कुकरचा अचानकपणे स्फोट झाला. या स्फोटात 28 वर्षीय सुनील मारवाड याचा जागीच मृत्यू झाला. तर सुनीलची पत्नी आणि 2 वर्षाच्या मुलासहित अन्य एक मजूर असे तिघेजण जखमी झाले आहे. या जखमींवर उदगीरच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!