Tuesday, October 15, 2024

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या नांदेडमध्ये, दोन दिवसीय दौरा, अनेक कार्यक्रम; खासदार हेमंत पाटील, आमदार कल्याणकर यांच्या निवासस्थानी जाणार

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेडहून हिंगोली जिल्ह्यातही जाणार

नांदेड– राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. ते उद्या रात्री नांदेडमध्ये येत असून मुख्यमंत्री शिंदे यांचा नांदेडमध्ये हा दोन दिवसीय दौरा असणार आहे. गुरुद्वारा दर्शन, मेळावा, पूरग्रस्त भागांची पाहणी यासह या दौऱ्यात अनेक कार्यक्रम असून खासदार हेमंत पाटील तसेच आमदार बालाजी कल्याणकर यांच्या निवासस्थानीही ते जाणार आहेत.

संपूर्ण दौरा कार्यक्रम 👇🏻

त्यांचे नांदेडमधील कार्यक्रम पुढीलप्रमाणे: रविवार 7 ऑगस्ट 2022 रोजी नवी दिल्ली येथून विमानाने श्री. गुरुगोविंद सिंगजी विमानतळ, नांदेड येथे रात्री 9.15 वाजता आगमन.रात्री 9.30 वाजता शासकीय विश्रामगृह, नांदेड येथे आगमन व राखीव.

सोमवार 8 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 10.30 वा. शासकीय विश्रामगृह, नांदेड येथून मोटारीने गुरुद्वाराकडे प्रयाण. सकाळी 10.45 ते 11.15 वा. हुजूर साहिब गुरुद्वारा येथे राखीव. सकाळी 11.15 ते 12.15 वा. खासदार हेमंत पाटील यांच्या निवासस्थानी राखीव. दुपारी 12.15 ते 12.45 नांदेड मनपा अंतर्गत शहरातील उत्तर मतदार संघातील मुलभूत सुविधा कामांचे भूमीपुजन. स्थळ- शिवमंदिर, कॅनाल रोड, तरोडा नाका, नांदेड . हिंगोली जिल्हा सीमा ते आलेगाव निळा नांदेड व परभणी जिल्हा सीमा ते पुर्णा नांदेड रस्त्याच्या दुपदरीकरणाचे भूमीपुजन. स्थळ- वाय पॉईंट, छत्रपती चौक नांदेड . आसना नदीवरील पासदगाव जवळील पूलाचे भूमीपुजन. स्थळ- पासदगाव नांदेड.  नांदेड उत्तर मतदार संघातील पुरग्रस्त बाधित भागाची पाहणी. संदर्भ-आमदार बालाजी कल्याणकर. दुपारी 12.45 ते 1.30 वा.भक्ती लॉन्स, नांदेड येथे मेळावा. दुपारी 1.45 ते 2 वा. आमदार बालाजी कल्याणकर यांच्या निवासस्थानी राखीव.

दुपारी 2 वा. नांदेड येथून मोटारीने हिंगोलीकडे प्रयाण. सायं. 7 वाजता हिंगोली येथून मोटारीने नांदेड विमानतळाकडे प्रयाण. सायं. 7.45 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन व विमानाने मुंबईकडे प्रयाण.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!