ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

धर्माबाद (जि.नांदेड)– तेलंगणा राज्यातील तोंडाळा (तालुका तानुर) येथील मुलाने आपल्या जन्मदात्या पित्याचाच निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह महाराष्ट्रात नांदेड जिल्ह्याच्या धर्माबाद तालुक्यातील आतकुर गावाजवळ असलेल्या रेल्वे पटरीवर आणून टाकला. ही घटना २१ ते २२ मार्च दरम्यान घडली.
धर्माबाद तालुक्यातील आतकुर गावाजवळ रेल्वे पटरीवर एखादा रेल्वेने अपघात झाल्याचे दाखविण्याचा बनाव धर्माबाद पोलिसांनी उघडकीस आणला. तोंडाळा तालुका तानुर तेलंगणा राज्य येथील शंकर विठ्ठल बोगुलवार (वय 54) यांचा त्याच्या मुलाने गळा आवळून निर्घृण खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी वडिलांचा मृतदेह महाराष्ट्राच्या हद्दीतील आतकुर शिवारात रेल्वे पटरीवर आणून टाकला. आपली पत्नी झोपली त्याठिकाणी वडीलही का झोपले? या रागातून हा खून करण्यात आल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
याप्रकरणी चंद्रकलाबाई भुमय्या गड्डम या मयताच्या बहिणीने दिलेल्या फिर्यादीवरून धर्माबाद पोलीस ठाण्यात विठ्ठल शंकर बोगुलवारविरुद्ध खून व पुरावा नष्ट करणे या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धर्माबाद पोलिसांनी आरोपीला अटक केली असून न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजय पंतोजी करत आहेत.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
