Friday, December 6, 2024

‘मोक्का’मधील फरार आरोपीस रुग्णालयातून शिताफीने अटक, गावठी पिस्टलसह जिवंत काडतुसं जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड–  जिल्ह्यातील अनिल पंजाबी यांचे गँगमधील सर्व आरोपीतांना पोलीस ठाणे शिवाजीनगर येथील गंभीर गुन्ह्यामध्ये मोक्का लावण्यात आला होता. सदर गुन्ह्यातील फरार आरोपी शेख अजरोद्यीन ऊर्फ बांगा शेख रहीमोद्यीन रा श्रावस्तीनगर, नांदेड हा फरार होता. सदर गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेवुन अटक करण्यात आली आहे.

पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांना आदेशीत केले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक स्थागुशा नांदेड यांनी स्था. गु. शा. येथील अधिकारी व अमंलदार यांचे पथक तयार केले होते.

सदर गुन्हयाचा स्था. गु. शा. नांदेड व पोलीस ठाणे सोनखेड यांचेकडुन समांतर तपास चालु असताना, दिनांक 27 फेब्रुवारी रोजी पोलीस ठाणे शिवाजीनगर गुरंन 379/2021 कलम 395 भा द वि सहकलम 3 (1) (ii), 3(2), 3(4) महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियत्रंण अधिनियम मधील फरार आरोपी शेख अजरोद्यीन ऊर्फ बांगा शेख रहीमोद्यीन रा श्रावस्तीनगर, नांदेड हा मुगट येथे येणार असल्याबाबत पक्की माहिती व्दारकादास चिखलीकर यांना मिळाल्याने त्यांनी स्थागुशाचे अधिकारी व अमंलदार यांना सोबत घेवून सरकारी दवाखाना मुगट येथे सापळा रचुन शेख अजरोद्यीन ऊर्फ बांगा यास ताब्यात घेतले. या आरोपीचे ताब्यात एक गावठी बनावटीचे पिस्टल सहा जिवंत काडतुस, एक मोबाईल व एक फोर्ड कंपनीची इंडीव्हर चारचाकी जिप क्रमांक (एम एच 14 बीसी 0289) किंमती 15 लाख असा एकुण 15 लाख 60 हजार रुपयाचा माल जप्त करण्यात आला आहे. नमुद आरोपी पुढील तपासकामी शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

आरोपीविरुध्द नांदेड व पुणे जिल्ह्यामध्ये अनेक गुन्हे दाखल असून तो विविध गुन्ह्यामध्ये आरोपी पोलिसांना हवा होता. कलम 395 भा द वि सहकलम 3(1)(ii) महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियत्रंण अंतर्गत हा आरोपी मोक्का सारख्या गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपी होता. नमुद आरोपीकडुन आणखीन गंभीर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

सदरची कामगिरी पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक निलेश मोरे, विजय कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली व्दारकादास चिखलीकर, सपोनि पांडुरंग भारती, पोउपनि सचिन सोनवणे, अशिष बोराटे, सपोउपनि  गोविंद मुंडे, जसवंतसिंघ शाहु, पोह भानुदास वडजे, सखाराम नवघरे, मारोती तेलंग, संजय केंद्रे, पो ना अफजल पठान, पो ना पदमा कांबळे, राजु सिटीकर, विठल शेळके, पो कॉ तानाजी येळगे, मोतीराम पवार , विलास कदम, पोकॉ गजानन बयनवाड बालाजी मुंडे यांनी पार पाडली आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!