Sunday, May 28, 2023

मोबाईल गेमचे भूत, गेम खेळत नांदेडचा मुलगा पोहोचला थेट नाशिकला

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

◆ पबजी गेमसारख्याच असणाऱ्या फ्री फायर गेमचे वेड

नरसी (जि.नांदेड)- मोबाईलवर पबजी या गेमसारखाच मोबाईल गेम असणारा फ्री फायर गेम खेळता खेळता 12 वर्षाचा मुलगा नांदेडहून रेल्वेने थेट नाशिकला पोहोचल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. पोलिसांच्या सतर्कतेमुळे या मुलाला 24 तासांनंतर मुलाच्या वडिलांकडे सोपवण्यात आले.

नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील गाव असणारे मात्र कुंटूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणारे हरनाळा या गावातील मुलाच्या बाबतीत ही घटना घडली आहे. हरनाळा येथील नागेश जाहुरे (वय 12) हा मुलगा सकाळी अंगणात मोबाइलवर पबजी या गेमसारखाच मोबाईल गेम असणारा फ्री फायर गेम खेळत होता. नागेशला हा फ्री फायर गेम खेळण्याचा नाद गेल्या काही काळापासून लागलेला होता. मुलगा नेहमीप्रमाणे मोबाईलवर खेळतोय म्हणून घरच्यांनी त्याच्याकडे फारसे लक्ष दिले नाही. मात्र मोबाईलवर गेम खेळता- खेळता नागेश नांदेड रेल्वे स्थानकावर पोहोचला व सकाळी साडे दहाच्या नांदेडहुन नाशिकमार्गे मुंबईला जाणाऱ्या तपोवन एक्सप्रेसमध्ये बसला. इकडे काही वेळाने नागेशच्या घरी तो दिसत नाही म्हणून घरच्यांची त्याचा शोध सुरू केला. मात्र सर्व ठिकाणी शोधून देखील नागेश सापडला नाही, तेव्हा तो बेपत्ता असल्याची तक्रार त्याच्या वडिलांनी कुंटूर पोलीस ठाण्यात दिली. कुंटूर पोलिसांनी नागेशचे फोटो सर्वत्र पाठविले. 

याच दरम्यान नाशिक रोड येथे रेल्वे स्थानकावर पोलिसांना तपोवन एक्स्प्रेसमध्ये नागेश आढळला. तो घाबरलेला होता आणि त्याला काहीच व्यवस्थित बोलता- सांगता येत नव्हते. पोलिसांनी काही वेळ त्याच्याशी बोलून, त्याला विश्वासात घेऊन चर्चा केल्यानंतर त्याने त्याच्याबद्दलची खरी माहिती पोलिसांना दिली. गेमच्या माध्यमातून ओळख झालेल्या मित्राला भेटण्यासाठी आपण नांदेडहून नाशिकला आल्याचे नागेश सांगत आहे. पोलीस या प्रकरणात अधिक तपास करत आहेत. नाशिक पोलिसांनी नंतर मुलाच्या घरी तो सापडल्याची माहिती कळविली. तो सुखरूप सापडल्याने त्याच्या कुटुंबाने सुटकेचा निःश्वास सोडला. पालकांनी नाशिकला जाऊन नागेशला ताब्यात घेतले आणि त्यांचे घर गाठले.

नागेशला घरात पाहिजे ते सर्व मिळत असे. यातूनच वडिलांनी लॉकडाऊनच्या काळात त्याला मोबाईल घेऊन दिला. आणि याच लॉकडाऊनच्या काळात नागेशला मोबाईलमध्ये गेम खेळण्याचा नाद लागला आणि एकप्रकारे या मोबाईल गेमचे भूतच जणू त्याच्या मानगुटीवर बसले. या नादातून त्याने आपले घर सोडले होते. त्यामुळे या मोबाईल गेमवर नियंत्रण आणणे गरजेचे बनले आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,785FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles

error: Content is protected !!