Friday, July 19, 2024

मोबाईल घेण्यासाठी एसपी ऑफिसमध्ये झाली गर्दी: पोलिसांनी 12 लाख 82 हजार रूपयांचे गहाळ 80 अँड्रॉईड मोबाईल नागरिकांना परत मिळवून दिले; सायबर शाखेची कारवाई

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड- मोबाईल घेण्यासाठी बाजारात गर्दी होताना आपण पाहिले आहे. पण नांदेडमध्ये मात्र मोबाईल घेण्यासाठी चक्क एसपी ऑफिसमध्ये गर्दी झाली होती. आणि त्याचे सुखद कारण होते, पोलिसांनी गहाळ झालेले मोबाईल परत मिळवून दिल्याचे! नांदेड पोलिसांनी 12 लाख 82 हजार रूपयांचे गहाळ 80 अँड्रॉईड मोबाईल नागरिकांना परत मिळवून दिले.  सायबर शाखेने कारवाई करून हे मोबाईल मिळविले होते.

जिल्ह्यातील सार्वजनिक ठिकाणाहून व बाजारातून महागडे मोबाईल गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध घेण्याकरीता पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी सायबर पोलीस निरीक्षक नानासाहेब उबाळे यांना आदेशीत केले होते. सायबर शाखेने त्यानूसार सायबर सेलचे एक पथक व नांदेड जिल्ह्यातील सर्व उपविभागाचे पथक तयार करून मिसिंग मोबाईलचा शोध घेण्याची मोहीम राबविण्यात आली होती.

नांदेड येथील उपविभागातील पथकाने व स्थागुशाच्या पथकाने जिल्ह्यातील गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध वेगवेगळया ठिकाणी जावून नांदेड जिल्ह्यातील एकूण 80 मोबाईल किंमत 12 लाख 82 हजार 900 रूपयाचे हस्तगत केले आहेत. त्यांचे आज एकत्रितरीत्या पोलीस अधिक्षक यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. संबंधितांनी सोबतचे यादीतील मोबाईलचे आयएमईआय नंबरची खात्री करून ज्याचे मोबाईल आहेत त्यांनी घेवून जाण्याचे आवाहन सायबर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अविनाश कुमार, डॉ. खंडेराय धरणे, भोकर गृह पोलीस उपअधिक्षक  डॉ. अश्विनी जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक व्दारकादास चिखलीकर, प्रशांत देशपांडे, नानासाहेब उबाळे, पो.स्टे सायबर पोउपनि जी. बी. दळवी, सोपान धोरवे, पोलीस अंमलदार सुरेश वाघमारे, राजेन्द्र सिटीकर, दिपक ओढणे, विलास राठोड, रेशमा पठाण, अनिता नलगोंडे दाविद पिडगे, दीपक शेवाळे, मोहन स्वामी, किशोर जैस्वाल, काशिनाथ कारखेडे, व्यंकटेश सांगळे, सौरभ सिद्धेवार यांनी पार पाडली.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!