Friday, June 9, 2023

युक्रेनमध्ये अडकलेले नांदेडचे 30 पैकी 3 विद्यार्थी परतले; विमानतळावर पालकांसह पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांनी केले स्वागत; विद्यार्थी म्हणाले, परत जाणार…

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड– रशियाने युद्ध पुकारल्यामुळे युक्रेनमध्ये फसलेले नांदेडचे तीन विद्यार्थी आज सुखरूप शहरात परतले. विमानतळावर त्यांच्या स्वागतासाठी कुटुंबियांसह पालकमंत्री अशोक चव्हाण, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, माजी राज्यमंत्री डी.पी. सावंत, माजी आमदार हणमंत पाटील बेटमोगरेकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

✈️ विमानतळावरील व्हिडिओ👇🏻

नांदेडचे सुमारे ३० विद्यार्थी युक्रेनमध्ये फसले आहेत. त्यापैकी आज प्रशांत नरोटे, तेजस गायकवाड, संजीवनी वन्नाळीकर हे विद्यार्थी नांदेडमध्ये परतले आहेत. हे विद्यार्थी सुखरूप घरी परतल्यानंतर त्यांच्या व कुटुंबियांच्या डोळ्यात अश्रू तरळले!

संबंधित बातमी 1 👆🏻

या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी उपस्थित असलेले पालकमंत्री अशोक चव्हाण यांनीही सोशल मीडियाद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या. युक्रेनमध्ये फसलेले नांदेडचे काही विद्यार्थी आज सुखरूप परतले. त्यांच्या हालापेष्टा ऐकून मन व्यथित झालं. पण घरी परतल्याचा त्यांच्या व पालकांच्या चेहर्‍यावरील आनंद शब्दांत व्यक्त करण्यापलिकडचा होता, असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.

संबंधित बातमी 👆🏻

यावेळी विद्यार्थ्यांनी युक्रेनमधुन बाहेर पडताना त्यांना आलेले अनुभव यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितले. तसेच सर्व परिस्थिती सुरळीत झाल्यावर शिक्षणासाठी परत जाणार असेही विद्यार्थ्यांनी यावेळी सांगितले.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,803FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles

error: Content is protected !!