Wednesday, February 28, 2024

युक्रेनमध्ये नांदेडचे तब्बल 20 विद्यार्थी, सर्वजण सुखरूप असल्याची प्रशासनाची माहिती; लातूरमधील सर्वाधिक 27 विद्यार्थी अडकले

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड- युक्रेनमध्ये नांदेडचे तब्बल 20 विद्यार्थी अडकले असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली आहे. हे सर्व विद्यार्थी सुखरूप असल्याची माहितीही त्यांनी दिली. दरम्यान, लातूरमधील सर्वाधिक 27 विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकल्याची माहिती पुढे आली असून मराठवाड्यातील एकूण 67 विद्यार्थी तेथे असल्याचे सांगण्यात येते. युक्रेनमध्ये अडकलेल्या एकूण विद्यार्थी आणि सर्व नागरिकांची आणखी निश्चित माहिती प्रशासनाकडून संकलित केली आहे.

लातूर जिल्ह्यातील 27 विद्यार्थी युक्रेन मध्ये असून सर्वजण सुखरूप असल्याचे प्रशासनाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे. लातूर जिल्ह्यातील विविध तालुक्यातून 27 विद्यार्थी युक्रेन मध्ये असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडे आली असून विद्यार्थी सुखरूप आहेत. पुढील कार्यवाहीसाठी जिल्हा प्रशासनाने ही यादी राज्यशासनाकडे पाठवली आहे. अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी साकेब उस्मानी यांनी दिली आहे.

यूक्रेनमधील भारतीय दूतावासाकडून भारतीयांसाठी आज मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आली असून सीमा भागाजवळ असलेल्यांना आजुबाजुच्या देशात हलविण्याला सर्वप्रथम प्राधान्य देत, तसे प्रयत्न करण्यात येत असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.

संबंधित बातमी 👆🏻

अडकलेले विद्यार्थी आणि भारतीय नागरिकांना मायदेशी परत आणण्यासाठी भारताकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. या अडकलेल्या विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी केंद्र सरकार अनेक मार्गांचा अवलंब करत आहे आता पोलंड मार्गे भारतीयांना आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती आहे.

दरम्यान रशिया आणि युक्रेन या देशात युद्ध सुरू झाले असून या परिस्थितीत युक्रेनमध्ये व्यवसायाच्या निमित्त गेलेल्या आणि तिकडे अडकलेल्या मराठवाड्यातील विद्यार्थी आणि नागरिकांची माहिती घेतली जात आहे. त्यात नातेवाईक, पालकांनी प्रशासनाशी संपर्क साधून ही माहिती दिली आहे. काही विद्यार्थी वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी तर काही नागरिक व्यवसाय, नोकरीनिमित्त युक्रेनमध्ये आहेत.

मराठवाड्यातील 67 विद्यार्थी
मराठवाड्यातील 67 विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. यामध्ये नांदेड 20, परभणी 4 , लातूर 27, उस्मानाबाद 6, औरंगाबाद 3 , जालना 7 अशा संख्येने विद्यार्थांचा समावेश आहे. नांदेड जिल्ह्यातील 20 विद्यार्थी युक्रेनमध्ये असून सर्व विद्यार्थी सुरक्षित असल्याचेही माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली आहे.

सर्व विद्यार्थी एमबीबीएस शिक्षणासाठी युक्रेनला गेले आहेत. राज्यातील जवळपास 100 हून जास्त विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले असल्याचे सांगण्यात येते.

नांदेड जिल्ह्यातील ज्यांचे ज्यांचे नातलग, कुटुंबातील सदस्य, विद्यार्थी युक्रेनमध्ये आहेत, त्यांच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने समन्वयाची व्यवस्था करण्यात आली आहे. कोणी अडकले असल्यास त्यांना सुरक्षित ठिकाणी आणण्याबाबतची कार्यवाही करण्यात येत आहे. नातलगांसाठी तहसील कार्यालयासमवेत जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन टोल फ्री नंबर 1077 किंवा (02462) 235077 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन निवसी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी यांनी केले आहे.

अधिक मदतीसाठी केंद्रीय परराष्ट्र मंत्रालय, नवी दिल्ली येथे नागरिकांच्या माहितीसाठी व मदतीसाठी नियंत्रण कक्ष स्थापन केला असून तेथील हेल्पलाईन नंबर पुढीलप्रमाणे आहेत. १८००११८७९७ (टोल फ्री), +९१-११-२३०१२११३, +९१-११-२३०१४१०४, +९१-११-२३०१७९०५ आहे व फॅक्स नंबर +९१-११-२३०८८१२४ हा आहे व तेथील ई-मेल आय डी situationroom@mea.gov.in हा आहे.  

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]

Latest Articles

error: Content is protected !!