Wednesday, July 24, 2024

‘येळकोट येळकोट जय मल्हार’च्या गजरात बेलभंडारा उधळत खंडोबाचा पालखी सोहळा उत्साहात संपन्न

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड– दक्षिण भारतातील प्रसिद्ध असलेल्या माळेगावच्या खंडोबा यात्रेनिमित्त जिल्हा प्रशासनानाच्यावतीने शनिवार दि. १ जानेवारी रोजी दुपारी यळकोट यळकोट जय मल्हारच्या गजरात मान्यवरांच्या उपस्थितीत पालखी सोहळा पार पडला.

जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी शासनाच्या सूचनेवरून कोरोना व ओमायक्रॉनच्या संकटामुळे यावर्षी यात्रा उत्सवाला प्रतिबंध घालण्यात आले आहे. केवळ पालखी सोहळा काढण्यास शासनाने परवानगी दिली होती. शनिवारी मानकऱ्यांच्या उपस्थितीत जिल्हाप्रशासनाच्या वतीने पालखी पुजन सोहळा पार पडला. यावर्षी जिल्हा प्रशासनाने शासकिय  यात्रेमध्ये दुसरे कार्यक्रम आणि सार्वजनिक स्वरूपातील यात्रा भरविण्यात निर्बंध घातले आहेत. शनिवारी पालखी शासकीय विश्रामगृह येथे आल्यानंतर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, आमदार अमर राजूरकर, आमदार मोहनराव हंबर्डे यांच्यासह जिल्हा परिषदेचे पदाधिकारी व माळेगावचे सरपंच यांनी पूजन केले.

यावेळी आमदार जितेश अंतापूरकर, आमदार मोहन हंबर्डे, जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा पद्मा सतपतलवार रेड्डी, सभापती सुशीलाताई बेटमोगरेकर, संजय बेळगे, रामराव नाईक, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप बेटमोगरेकर, जिल्हा परिषद सदस्या प्रणिताताई चिखलीकर, सरपंच प्रतिनिधी हनुमंत धुळगुंडे, उपसरपंच बालाजी नंदाने, देवस्थान कमिटीचे अध्यक्ष दयावान पाटील, माजी सरपंच केरबा धुळगुंडे, माजी उपसभापती रोहित पाटील यांची उपस्थिती होती.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!