ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
लातूर- महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी दोन दिवस मराठवाड्यात असून ते बीड आणि लातूर दौरा करत आहेत. आज शुक्रवारी सकाळी त्यांचे लातूर विमानतळावर आगमन झाले. जिल्हा प्रशासनाच्यावतीने लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी यांनी यांनी राज्यपालांचे स्वागत केले.
याप्रसंगी भाजपचे आमदार अभिमन्यू पवार, आमदार रमेशअप्पा कराड, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, माजी आ.सुधाकर भालेराव, जिल्हा पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे, अतिरिक्त जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे यांनीही कोश्यारी यांचे स्वागत केले.
विमानतळावरून राज्यपाल बीड जिल्ह्याच्या नियोजित दौऱ्यासाठी रवाना झाले. उद्या बीड दौऱ्यावरून सकाळी 10.15 वाजता लातूर येथे येणार असून त्यानंतर जिल्हा सैनिक कल्याण बोर्ड यांचे अधिकारी आणि रेड क्रॉस सोसायटीचे अधिकारी यांच्यासोबत चर्चासाठी वेळ राखून ठेवण्यात आला आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻