Thursday, June 1, 2023

राज्यातील विविध जिल्ह्यांसह नांदेड जिल्ह्यातील ११ नगरपंचायत, नगरपरिषदांवर प्रशासक

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

शासनाच्या नगरविकास विभागाचा निर्णय

नांदेड– राज्यभरात ज्या नगरपंचायत, नगरपरिषदांची मुदत संपली आहे. तसेच काही दिवसात संपणार आहे, अशा ठिकाणी प्रशासक म्हणून वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती होणार आहे. या संदर्भातील आदेश शासनाच्या नगर विकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांनी काढले आहेत. दरम्यान नांदेड जिल्ह्यातील ११ नगरपंचायत, नगरपरिषदांचा यात समावेश असून येथे प्रशासकाची नियुक्ती होणार आहे.

जगभरात कोविडमुळे झालेले संक्रमण आणि त्यामुळे भारतात पडलेला त्याचा प्रभाव यामुळे अनेक सार्वत्रिक निवडणुका वेळेवर पार पडल्या नाहीत. तर काही ठिकाणी निवडणुक झाली आहे. मात्र अद्याप निकाल आलेले नाहीत. काही ठिकाणी अजून निवडणुका होण शिल्लक आहेत. यामुळे शासनाने संबंधीत नगर परिषदा आणि नगर पंचायतींवर प्रशासक नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. नगर विकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांनी काढलेल्या ओदशात राज्यातील औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यांतील नगरपंचायत व नगरपरिषदेचा समावेश आहे.

यात नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर, माहूर या नगर पंचायती आणि देगलूर, बिलोली, धमार्बाद, हदगाव, कंधार, कुंडलवाडी, मुदखेड, मुखेड, उमरी नगर परिषदांचा समावेश आहे. तर लातूर जिल्ह्यातील उदगीर, अहमदपूर, औसा, निलंगा या नगरपरिषदांचा समावेश आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड, पैठण, गंगापूर, खुलताबाद या नगर परिषदांवर प्रशासक नियुक्त झाला आहे. जालना जिल्ह्यात जालना, अंबड, भोकरदन, परतूर नगर परिषदांचा समावेश या आदेशात आहे. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड, जिंतूर, सेलू, मानवत, पाथरी, पूर्णा आणि सोनपेठ नगरपरिषदांवर प्रशासक नियुक्त झाला आहे. हिंगोली जिल्ह्यातील वसमत, हिंगोली आणि कळमनुरी, बीड जिल्ह्यातील बीड, अंबाजोगाई, माजलगाव, परळी (वै.), गेवराई आणि धारूर, उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद, भुम, कळंब, मुरूम, नळदुर्ग, उमरगा, परंडा, तुळाजापूर या नगर परिषदांवर प्रशासक नियुक्त झाला आहे.

मुदत संपणाऱ्या नगरपरिषदा

नांदेड जिल्ह्यातील अर्धापुर, माहूर अशा दोन नगरपंचायत व देगलूर, बिलोली, धर्माबाद, हदगाव, कंधार, कुंडलवाडी, मुदखेड, मुखेड, उमरी या नऊ नगरपरिषदांचा समावेश आहे. त्यात २९ डिसेंबर २०२१ रोजी अर्धापुर, माहूर आशा दोन नगरपंचायत तर धर्माबाद, हदगाव, उमरी या तीन नगरपरिषदांची मुदत संपत असून, १७ फेब्रुवारी २०२२ रोजी देगलूर, बिलोली, कंधार, कुंडलवाडी, मुदखेड या पाच नगरपरिषदांची मुदत संपत आहे तर २१ फेब्रुवारी २०२२ रोजी मुखेड या एका नगरपरिषदेची मुदत संपणार आहे.

शासनाने मुदत संपणाऱ्या नगरपंचायत, नगरपरिषदेचा प्रशासक नियुक्त करण्याच्या घेतलेल्या या निर्णयामुळे स्थानिक स्तरावरील कामकाज सुरळीत राहणास मदत होणार आहे. मात्र ज्यांनी आगामी निवडणूकीकडे डोळे लावले होते, त्यांची तुर्त निराशा झाली आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,790FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles

error: Content is protected !!