ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड– राज्यातील ४५ निवड श्रेणी उपजिल्हाधिकाऱ्यांना शासनाने अपर जिल्हाधिकारीपदी पदोन्नती दिली आहे. यात सध्या नांदेड येथे निवासी उपजिल्हाधिकारी पदावर कार्यरत प्रदीप कुलकर्णी यांच्यासह त्यांच्या पत्नी उपजिल्हा निवडणूक अधिकारी दीपाली मोतीयाळे यांचाही समावेश आहे.
याचबरोबर यापूर्वी नांदेड येथे आपले कर्तव्य बजावलेले हणमंत आरगुंडे, डॉ. निशिकांत देशपांडे, संजय सरवदे, शिवाजी शिंदे, मंदार वैद्य, प्रताप काळे आदींचा यात समावेश आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून हे अधिकारी पदोन्नतीच्या प्रतिक्षेत होते. अखेर शासनाने ही पदोन्नती जाहीर केली असून एकूण 45 उपजिल्हाधिकाऱ्यांना अपर जिल्हाधिकारीपदी ही पदोन्नती देण्यात आली आहे.
शासनाचे सहसचिव डॉ. माधव वीर यांनी पदोन्नतीचे हे आदेश जारी केले आहेत.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻