Sunday, October 6, 2024

रात्री सोबत जेवले, झोपले: पुण्याहून आलेल्या मित्राने चाकूने भोसकून केला मित्राचा खून; मुखेड तालुक्यातील घटना

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड/मुखेड– मुखेड तालुक्यातील होनवडज येथील एका मिञाने दुस-या मिञाचा पैशाच्या देण्याघेण्याच्या क्षुल्लक कारणावरून धारदार चाकूने भोसकुन खून केला. ही घटना होनवडज येथे काल दि. 2 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास घडली.

आरोपी ज्ञानेश्वर प्रभाकर जाधव (वय २६, व्यवसाय चालक मूळ रा. होनवडज/ हल्ली मु. भोसरी, पुणे) हा दि. 1 फेब्रुवारी रोजी पुणे येथून होनवडज येथे आला. त्यानंतर तो रात्री 8 वाजताच्या सुमारास आपला मिञ व भावकितील शहाजी मोहन जाधव (वय २५) याच्या घरी आला. दोघेही जेवण करुन एकञच झोपले. शहाजी हा सकाळी लवकर उठून दुधडेअरीवर दुध संकलन करण्यासाठी गेला. त्यानंतर सकाळी नऊ वाजता आरोपी ज्ञानेश्वर हा पण दुध डेअरीवर गेला आणि त्याने  शहाजीला पैसे दे म्हणून हुज्जत घातली. आता लगेचच माझ्याकडे पैसे नाहीत, काका आल्यास देतो असे शहाजी म्हणत होता.

अशातच त्याचे वडिल मोहन जाधव आले. दोघांचा वाद मिटवून ते शहाजीला शेतात सोयाबिन पेरण्यास घेऊन गेले. सायंकाळी सहा वाजता शहाजी जेवण करण्यासाठी गावाकडे आला. तो सहा वाजताच्या सुमारास होनवडज बसस्थानक चौकात येताच ज्ञानेश्वर याने शहाजीसोबत पुन्हा हुज्जत घातली आणि अचानकच आपल्या जवळील धारदार शस्ञाने पोटात, छातीवर व मानेवर सपासप वार करुन गंभीर जखमी केले. जखमी शहाजीला उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथे आणले असता प्राथमिक उपचार करुन नांदेडला पाठविण्यात आले. नांदेड येथे शासकिय रुग्नालयात पोहचताच सकाळी सुमारे नऊ वाजताच्या सुमारास तो मयत झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले.

ही घटना घडताच पोलिस निरिक्षक विलास गोबाडे, सहाय्यक पोलिस निरिक्षक संतोष केंदे यांनी आरोपीला ताब्यात घेतले. मयताचे वडिल मोहन जाधव यांच्या तक्रारीवरुन आरोपीविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. उपविभागीय पोलिस अधिकारी मारोती थोरात, पोलीस निरीक्षक यांनी घटनास्थळी भेट दिली.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!