Saturday, July 27, 2024

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार बापूसाहेब गोरठेकर यांचे निधन; आज 4 वाजता गोरठा येथे अंत्यविधी

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड- राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार श्रीनिवासराव उर्फ बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांचे बुधवारी रात्री येथील खाजगी रुग्णालयात निधन झाले.ते ७८ वर्षांचे होते. त्यांनी भोकर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी दुपारी ४ वाजता त्यांचे मूळगाव गोरठा (ता. उमरी) येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा भोकर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार श्रीनिवास ऊर्फ बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांची प्रकृती बुधवारी अचानक खालावली. त्यानंतर नांदेड येथील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असताना बुधवारी रात्री उशिरा त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने भोकर विधानसभा मतदारसंघावर शोककळा पसरली आहे.

माजी आमदार बापूसाहेब गोरठेकर यांची काल प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर हायपॉवर व्हेंटिलेटरवर ठेवून उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान बुधवारी रात्री उशिरा त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात  पत्नी, मुले, मुली, नातू असा परिवार आहे.

गोरठेकर २००४ ते २००९ दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार होते. त्यानंतर ते दीर्घकाळ  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष होते. भोकर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेल्या गोरठेकर यांचे उमरी आणि धर्माबाद या दोन तालुक्यांत त्यांचे जबरदस्त राजकीय वर्चस्वही होते. तसेच कार्यकर्त्यांचे मोठे जाळेही होते. मागील निवडणुकीत ते नायगाव विधानसभा मतदारसंघातून कमी मतांच्या अंतराने पराभूत झाले होते. तरीही आजही त्यांची मतदारसंघात चांगली पकड होती. त्यांनी नांदेड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासह नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्षपदही भूषविले. याचबरोबर इतरही अनेक संस्थांवर त्यांनी अनेक पदे भूषविली. मध्यंतरी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता, मात्र तिथे ते फार काळ रमले नाहीत आणि त्यांनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. भोकरसह नायगाव मतदारसंघ, एका मोठ्या नेतृत्वाला मुकला असल्याची भावना व्यक्त होत आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!