Saturday, July 27, 2024

राष्ट्रीय तपास यंत्रणा NIA च्या देशभरातील 13 ठिकाणांसह नांदेडमध्येही धाडी; दहशतवादी संघटना ISIS च्या नांदेड कनेक्शनचा तपास, चौघांना घेतले ताब्यात

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड- राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) चे पथक नांदेडमध्ये शनिवार दि. २९ जूलै रोजी भल्या पहाटे धडकले. या पथकाने शहराच्या विविध भागात जाऊन तपासणी केली असून त्यांच्या हाती काही महत्त्वाचे धागेदोरे व साहित्य आणि कागदपत्र जप्त लागल्याचे सांगण्यात येते. या पथकाने जुनागंज येथील चार जणांना ताब्यात घेऊन त्यांची एटीएस कार्यालयात कसून चौकशी केली. जिल्ह्यात काही युवक ईसीस (ISIS) या दहशतवादी संघटनेशी संपर्कात आल्याने त्यांचे व्हाट्सअप मेसेज व अन्य मोबाईल कॉल तपासून त्यांचे मोबाईल व अन्य कागदपत्रे जप्त करण्यात आले असल्याचे सांगण्यात येते.

स्वातंत्र्य दिनाच्या अगोदर एनआयएने देशातली ही दुसरी कारवाई केल्याने सर्वत्र सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने देशातील सहा राज्यातील तेरा ठिकाणी छापेमारी केली असून यामध्ये महाराष्ट्र राज्यातील नांदेड आणि कोल्हापूरचा समावेश आहे. यासोबतच उत्तरप्रदेश सहानपूर येथे देवबंदमधून एका मदरशामध्ये शिक्षण घेणाऱ्या कर्नाटकातील फारूख नावाच्या विद्यार्थ्याला अटक केली आहे. त्याचा व्हाट्सअप ग्रुप ईसीसशी संबंध असल्याचे समोर आले आहे.

उत्तर उत्तरप्रदेशमधील देवबंद, मध्यप्रदेश मधील भोपाळ आणि रायसोन, गुजरातमधील भरूच, सुरत, नवसारी आणि अहमदाबाद तसेच बिहार राज्यातील अररिया आणि कर्नाटक राज्यातील भटकल आणि तुमकर या सोबतच महाराष्ट्रातील नांदेड आणि कोल्हापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. या सर्व ठिकाणी कारवाई केली असून त्यांच्या हाती अतिशय गोपनीय असे ईसीस संदर्भात कागदपत्र जप्त करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. एनआयएने आपल्या ट्विटर हँडलवर ही माहिती जाहीर केली असून 25 जून रोजी या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात कलम 153 (ए), 153 (बी) अंतर्गत 18, 18 (बी), 38 आणि 40 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नांदेडमधील देगलूर नाका, खडकपुरा, जुना गंज आदी भागात काही तरुणांची तपासणी करून मदरशामधीलही माहिती घेतल्याचे पुढे येत आहे. या प्रकरणाची चौकशी अत्यंत गोपनीय पद्धतीने होत असून नांदेड पोलीस व नांदेड एटीएसची मदत घेण्यात आल्याचे सांगण्यात येते.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!