Sunday, May 28, 2023

राष्ट्रीय महामार्गाची रखडलेली कामं ठरताहेत डोकेदुखी; हिमायतनगरमध्ये आमदारांनी केला शेकडो नागरिकांसह रास्तारोको

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

…अन्यथा तीव्र आंदोलन! अभियंता व ठेकेदारास इशारा

हिमायतनगर (जि. नांदेड)- शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या दोन वर्षापासून ठेकेदाराच्या मनमानी पणामुळे अर्धवट राहिले आहे. याची डोकेदुखी व नाहक त्रास येथील जनतेस होत आहे. याच्या निषेधार्थ आज दि. 5 मार्च रोजी हिमायतनगर येथे काँग्रेस आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी नागरिकांसह रास्ता रोको आंदोलन करीत वाहतूक ठप्प केली.

रस्त्याचे काम वेगाने पूर्ण झाले पाहिजे. येत्या पावसाळ्याच्या आत तत्काळ वेगाने पूर्ण झाके पाहिजे. हे काम एक महिन्यात पूर्ण करा अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा आमदार जळगावकर यांनी दिला आहे. आज दिनांक 5 मार्च रोजी दुपारी 1 वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

शहरातील राष्ट्रीय महामार्गाच्या रखडलेल्या कामाविरोधात हिमायतनगरमध्ये नागरिकांनी आंदोलन छेडले आहे. हिमायतनगर ते किनवट या राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या दोन वर्षांपासून रखडले आहे. त्यामुळे हिमायतनगर शहरात धुळीचे साम्राज्य पसरले आहे. परिणामी नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून येथून प्रवास करणाऱ्यांना दररोज त्रास सहन करावा लागत आहे. चांगल्या रस्त्याच्या अभावी प्रवाशांचे हाल होत आहेत. याविरोधात आज नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन छेडले. यावेळी मोठ्या प्रमाणावर नागरिक एकत्र आल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती.

हे काम तातडीने पूर्ण करावे यासाठी स्थानिकांनी वेळोवेळी निवेदने देत विनंत्या केल्या, मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. त्यामुळे स्थानिक आमदार आमदार माधवराव पाटील जवळगांवकर यांच्या नेतृत्वाखाली शेकडोंच्या संख्येने नागरिक आज रस्त्यावर उतरले.  यावेळी उपस्थित काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष विकास पाटील देवसरकर,माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष राठोड,गणेशराव शिंदे, माजी नगराध्यक्ष अब्दुल अखिल, माजी जिल्हा परिषद सदस्य समद खान, शहर अध्यक्ष संजय माने, बालासाहेब पाटील, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर शिंदे, जनार्दन ताडेवाड, शिवाजी पाटील माने, शे.रहीम,काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष फेरोज खान, राजेश्वर झरेवांड, फेरोज खुरेशी, संतोष माने, अनंता देवकत्ते, सुभाष शिंदे, प्रवीण कोमावार, पंडित ढोणे, योगेश चिल्कावार, परमेश्वर भोयर, अरविंद वानखेडे, किरण माने, मोहन ठाकरे, गजू झरेवाड, किशन नरवाडे, दशरथ सावळे, अमोल जोगदंड, सचिन दळवेसह काँग्रेस, युवक काँग्रेस व एन.एस. यु. आय.चे कार्यकर्ते आणि इतर नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,785FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles

error: Content is protected !!