Saturday, July 27, 2024

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा: पहाटे पावणेसहा पासून रात्री पावणे दहापर्यंत मार्गक्रमण; आज नांदेडमध्ये सुप्रिया सुळेंसह राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते होणार सहभागी

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

आज नांदेडमध्ये नवा मोंढा मैदानावर सभा

यात्रेच्या स्वागतासाठी पहाटेपासूनच हजारो लोक रस्त्यांच्या दुतर्फा उभे

पदयात्रेत ‘जातपात का बंधन तोडो, भारत जोडो, भारत जोडो’, घोषणांचा जयघोष

नांदेड- राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा पहाटे पावणेसहा पासून सुरू होत असून ही यात्रा रात्री पावणे दहा पर्यंत मार्गक्रमण करीत आहे. उद्या गुरुवारी नांदेडमध्ये सुप्रिया सुळे, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते या यात्रेत सहभागी होणार आहेत. यात्रेच्या स्वागतासाठी पहाटेपासूनच हजारो लोक रस्त्यांच्या दुतर्फा उभे राहत असल्याचे चित्र दिसून येत आहे. दरम्यान, आज गुरुवारी सायंकाळी नांदेडच्या नवा मोंढा मैदानावर राहुल गांधी यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

रस्त्याच्या दोन्ही बाजूला गावांच्या वेशीला, नाक्यांवर, चौका-चौकात कुटुंबेच्या कुटुंबे, शाळकरी मुले, तरुण आणि वयोवृद्ध लोकही यात्रेच्या स्वागतासाठी उभे राहत आहेत. गावागावातून ठिकठिकाणी पदयात्रेत लोक सामील होत आहेत. सूर्य जसजसा वर येईल तसा यात्रेचा आकार वाढत आहे. सात वाजेपर्यंत राहुल गांधी यांच्या मागे- पुढे माणसांची मोठी गर्दी होत आहे.

संबंधित बातमी १ 👇🏻

बुधवारी साठी गाठलेल्या कमलाबाई आपल्या सुना-नातवंडांसह देगलूर-नांदेड मार्गाला लागून असलेल्या किनाळा (ता. नायगाव) या छोट्याशा गावाच्या मुख्य रस्त्याच्या कडेला पहाटे दीड-दोन तास उभ्या होत्या. ‘राहुल गांधी माझ्या मुलासारखा….त्यांना बघायला साडेपाच वाजल्यापासून आलोय,” असे त्या सांगत होत्या. त्यांच्या आजूबाजूला गावातील २५-३०  महिला, मुलेही त्याच आकांक्षेने उभी होती. आज ते सर्वजण चार वाजताच उठून पदयात्रा पाहण्यासाठी, स्वागतासाठी आल्या होत्या. त्या रस्त्यावरून ६ वाजून २० मिनिटांनी पदयात्रा आली आणि कमलबाईंची इच्छा पूर्ण झाली. यात्रा जवळ येताच अशीच इच्छा असणारे  हजारो हात अभिवादनासाठी उंचावत होते, ऊर्जा देत होते.

राहुल गांधी यांच्या सुरक्षा कड्याबाहेर कोणा साधूंचा एक समूह बरोबरीने चालत होता. आठ-दहा  वारकरी भजन करत होते, कोणी फुले घेऊन, कोणी झेंडे उंचवत, कोणी महात्मा गांधी, डॉ बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा उंचावत, मुलींचे लेझीम पथक, कुठे पारंपरिक पोशाख, तर कुठे देशाची विविधतेतून एकता दर्शवणारी विविध रंगी वेशभूषा…असे अनेक रंग सोबत घेऊन पदयात्रा निघाली होती. “जातपात का बंधन तोडो…- भारत जोडो, भारत जोडो,” “वंदे मातरम”… अशा घोषणांनी वातावरण उत्साहाने भरून गेले होते.

नांदगावच्या शारजाबाई हनुमंत भद्रे वयाच्या पन्नाशीत यात्रेत पुढे होत्या, त्यांच्या सोबत ४० महिला आल्या होत्या. पहाटे लवकर उठून पाच वाजता आठ किलोमीटर अंतर कापून त्या शंकरनगरला आल्या होत्या. नायगावला महिला मुलांसह मोठ्या संख्येने रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभ्या होत्या. नरसी येथे लिटल स्टेप ज्ञानवर्धिनी शाळेच्या लहानग्या मुली एनसीसी गणवेशात स्वागतासाठी उभ्या होत्या, तर परभणीच्या पिंगळा येथील वारकरी शिक्षण संस्थेची मुले वारकऱ्यांच्या वेशभूषेत उभी होती.एका स्टेजवर गांधीजी, चाचा नेहरू, इंदिराजी यांच्या वेशभूषेत मुले होती, तर पुढे कथक नृत्यांगना सलामी देत होत्या. एका ठिकाणी स्वर्गीय राजीव गांधी आणि इंदिरा गांधी यांना आदरांजली वाहिली जात होती.

गुरूवार, दि. 10 नोव्हेंबर 2022
नांदेड जिल्हा पदयात्रा कार्यक्रम

स. 5.45 वा. कापशी गुंफा पदयात्रा प्रारंभ
स. 6.15 वा. महाटी फाटा
स. 6.40 वा. मारतळा
स. 8.00 वा. काकांडी
स. 8.45 वा. जवाहरनगर
स. 9.00 वा. तुप्पा फाटा
स. 9.30 वा. चंदासिंग कॉर्नर, नांदेड येथे राखीव

दु. 3.00 वा. देगलूर नाका, नांदेड पदयात्रा प्रारंभ
दु. 3.20 वा. बाफना टी-पॉईंट, नांदेड
दु. 3.35 वा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, नांदेड
दु. 3.45 वा. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, नांदेड
दु. 3.50 वा. मुथा चौक, वजिराबाद
दु. 3.55 वा. आयुर्वैदिक महाविद्यालय, नांदेड
दु. 4.00 वा. कलामंदीर, नांदेड
दु. 4.10 वा. जनता मार्केट, शिवाजीनगर, नांदेड
दु. 4.20 वा. महात्मा ज्योतिबा फुले पुतळा, नांदेड
दु. 4.30 वा. डॉ. शंकरराव चव्हाण पुतळा
दु. 4.40 वा. नवा मोंढा मैदान जाहीर सभा

संबंधित बातमी २ 👇🏻

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, खा. सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड सहभागी होणार

गुरुवार दिनांक 10 डिसेंबर रोजी खासदार राहूल गांधी यांची भारत जोडो यात्रा नांदेड शहरात येणार असून या यात्रेत सहभागी होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड हे उद्या दुपारी 12 वाजता विमानाने मुंबईहून नांदेड येथे येणार आहेत. त्यानंतर ते भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी भारत जोडो यात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष ( ग्रामीण ) हरिहरराव भोसीकर यांनी केले आहे.

नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्यावतीने भारत जोडो यात्रेचे स्वागत व सत्कार
भारत जोडो अभियान अंतर्गत खासदार राहुल गांधी यांची पदयात्रा गुरुवारी सकाळी ७.३० वाजता जवाहरनगर तुप्पा येथे येणार आहे. माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत दक्षिण विधानसभा मतदारसंघातर्फे आमदार मोहनराव हंबर्डे व पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या वतीने
वारकरी वेषभुषेमध्ये राहुल गांधी यांचे स्वागत करणार आहेत. या सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन आ.हंबर्डे यांनी केले आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!