Sunday, June 4, 2023

लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा; सोमवारी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

● नांदेडमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी काढले सुट्टीचे आदेश

मुंबई/नांदेड: भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा म्हणून राज्य सरकारने सोमवार ७ फेब्रुवारी २०२२ रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.


यासंदर्भात काढण्यात आलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, आज रविवार दि ६ फेब्रुवारी २०२२ रोजी भारतरत्न लता मंगेशकर यांचे दुःखद निधन झाले असून त्यांच्या निधनामुळे संगीत आणि कला विश्वाची अपरिमित हानी झाली आहे. या महान गायिकेला श्रद्धांजली वाहण्यासाठी, परक्राम्य संलेख अधिनियम, १८८१( सन १९८१चाअधिनियम २६ ) च्या कलम २५ खाली महाराष्ट्र शासनास सोपविण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून सोमवार दिनांक ७ फेब्रुवारी रोजी राज्यात दुखवटा म्हणून सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात येत आहे. 

दरम्यान, नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी नांदेड जिल्ह्यातील सोमवारच्या सार्वजनिक सुट्टीबाबतचे आदेश काढले.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,797FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles

error: Content is protected !!