Wednesday, July 24, 2024

लातूर जिल्ह्यात उदगीरजवळ बस आणि कारचा भीषण अपघात; कारमधील ०५ जण जागीच ठार, मयतांमध्ये लातूर- नांदेड जिल्ह्यातील नागरिक

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

लातूर: जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील लोहाराजवळ एस.टी. बस आणि कारचा भीषण अपघात होऊन पाच जण जागीच ठार आहेत. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही दुर्दैवी घटना आज मंगळवार ०४ ऑक्टोबर रोजी सकाळी घडली.

उदगीर आगाराची एसटी बस उदगीरहुन चाकूरकडे निघाली होती. तर एम एच २४ एबी ०४०८ ही स्विफ्ट डिजायर कार उदगीरकडे निघाली होती. मात्र उदगीर-लातूर महामार्गावरील लोहारा गावाजवळ  गुळगे मिलच्या जवळ एसटी आणि कारची भीषण टक्कर झाली. अपघात एवढा भीषण होता की कार मधील पाच जण जागीच ठार झाले. तर एक जण गंभीर जखमी आहे.

या भीषण अपघात अलोक तानाजी खेडकर, रा.संत कबीर नगर-उदगीर, अमोल जीवनराव देवक्तते-रा.रावनकोळा, ता. मुखेड, जि. नांदेड, कोमल व्यंकट कोदरे-रा.डोरणाळी ता.मुखेड, जि. नांदेड, यशोमती जयवंत देशमुख रा.यवतमाळ, नागेश ज्ञानेश्वर गुंडेवार रा.बिदर रोड, उदगीर यांचा अपघातात जागीच मृत्यू झाला आहे. तर प्रियांका गजानन  बनसोडे रा. गोपाळ नगर-उदगीर ह्या गंभीर जखमी झाल्या आहेत.

कार आणि बस दोन्ही वेगात असल्यामुळे हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे. अपघातानंतर स्विफ्ट डिझायर कारचा अक्षरशः चेंदा-मेंदा झाला आहे. घटनास्थळी रक्ता-मांसाचा अक्षरशः सडा पडलेला आहे. घटनास्थळी उदगीरचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॅनियल बेन, उदगीर शहर पोलीस, उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी- कर्मचारी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी उदगीरच्या सामान्य उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!