Saturday, July 27, 2024

लालपरी पुन्हा सुसाट; आषाढी यात्रेसाठी पंढरपूरला नांदेड विभागाच्या अडीचशे बस धावणार

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड (प्रल्हाद कांबळे)- आधी कोरोना, लॉकडाऊनमुळे आणि त्यानंतर संपामुळे अडचणीत आलेली लालपरी अर्थात एसटी पुन्हा सुसाट निघालेली आहे. पंढरपूर येथील आषाढी यात्रेसाठी जाणाऱ्या भाविक व यात्रेकरू प्रवाशांच्या सोयीसाठी ती सज्ज झाली असून नांदेड राज्य परिवहन महामंडळाच्या विभागीय कार्यालयाने २५० एसटी बस चालू करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वाधिक एसटी बस ह्या नांदेड आगारातून धावणार आहेत, अशी माहिती राज्य परिवहन महामंडळाचे विभागीय वाहतूक अधिकारी संजय वाळके यांनी “गोदातीर समाचार”शी बोलताना दिली.

मागील दोन वर्षापासून कोरोनाच्या महाभयंकर संकटात अडकलेल्या विठ्ठल भक्तांना पंढरपूरला जाता आले नाही. कोरोनामुळे प्रशासनाकडून सर्व मंदिराचे द्वार बंद असल्याने सगळ्याच यात्रा रद्द करण्यात आल्या होत्या. परंतु आता कोरोनाचा कर कमी झाल्याने व शासनाकडून कुठलेच प्रतिबंध नसल्याने विठ्ठल भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे. पंढरपूरकडे येणाऱ्या पुणे, आळंदी, देहू येथून हजारो भक्तांना घेऊन किर्तन, भजन करत विठ्ठल विठ्ठलाच्या गजरात दिंड्या रवाना झाल्या आहेत. राज्यभरातून मोठ्या प्रमाणात विठ्ठलभक्त पंढरपूरकडे आपल्या लाडक्या सावळ्या विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी व चंद्रभागेत स्नान करण्यासाठी उत्सुक झाले आहेत. जिल्ह्यातील विठ्ठल भक्तांची व यात्रेकरू प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून नांदेड विभागीय वाहतूक अधिकारी संजय वाळके यांनी आपल्या विभागातून तब्बल 250 बस सहा जुलै ते 14 जुलै दरम्यान चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांची व भक्तांची गैरसोय होणार नाही. जिल्ह्यातील कुठल्याही एखाद्या गावातून किंवा आगारातून एकदाच 40 ते 45 प्रवासी पंढरपूर जाणे आणि येणे करत असतील तर त्यांच्यासाठी विशेष गाडीची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे श्री वाळके यांनी सांगितले आहे.

आगार निहाय पंढरपूरला धावणार्‍या बसची संख्या

नांदेड- 50, भोकर- 26, किनवट- 16, मुखेड- 36, देगलूर- 31, कंधार- 36, हदगाव- 21, बिलोली- 26 आणि माहूर- 8 एसटी बस पंढरपूरकडे धावणार आहेत. प्रवाशांनी व यात्रेकरूंनी या बसेसचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री वाळके यांनी केले आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!