Sunday, June 16, 2024

लेकीला माहेरी घेऊन येताना दुचाकीला भीषण अपघात, बाप-लेकीचा दुर्दैवी मृत्यू; उदगीर- जांब रस्त्यावरील अपघात

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

मुखेड (जि. नांदेड)- सासरहून लेकीला माहेरी घेऊन निघालेल्या पित्याच्या दुचाकीला भीषण अपघात झाल्याची दुर्घटना उदगीर- जांब रस्त्यावर घडली. यात बाप- लेकीचा दुर्दैवी अंत झाला आहे.

बापासह लेकीचा दुचाकी अपघातात दुर्दैवी अंत झाल्याची घटना उदगीर- जांब रोडवर पाटोदा (खु.) फाट्याजवळ घडली. ही घटना सोमवारी रात्री दहाच्या सुमारास घडली. फुलवळ ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या सोमासवाडी येथील रहिवासी बालाजी (बाळू) किशनराव रासवते वय ४२ वर्षे हे त्यांची लेक राजश्री राजेश श्रीमंगले (लहानकर) वय २२ वर्षे हिस माहेरी आणण्यासाठी दि. २ जानेवारी सासर उदगीर येथे गेले होते. ते लेकीला घेऊन आपल्या दुचाकीवर उदगीरवरून जळकोट, जांब मार्गे फुलवळकडे निघाले होते. याचदरम्यान रात्री १० च्या सुमारास जळकोट पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या पाटोदा (खू.) पाटीजवळ त्यांच्या दुचाकीचा जबर अपघात झाला. या भीषण अपघातात बाप- लेकीचा दुर्दैवी अंत झाला.

सदरच्या अपघाताची नोंद जळकोट पोलीस स्टेशनला करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक पी. बी. कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ. चिमंदरे हे करत आहेत. बालाजी रासवते यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुली, एक मुलगा, तीन भाऊ असा मोठा परिवार आहे. या दुर्दैवी घटनेमुळे सोमासवाडीसह फुलवळमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!