Tuesday, November 5, 2024

लोकसभा निवडणूक जाहीर: नांदेड, परभणी, हिंगोलीसाठी २६ एप्रिल रोजी मतदान; ०४ जूनला मतमोजणी, आचारसंहिता लागू

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

• महाराष्ट्रात ५ टप्प्यात होणार निवडणूक

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकांसाठी आचारसंहिता जाहीर झाली आहे. निवडणूक आयोगाने आज शनिवारी दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद घेऊन निवडणुकांची घोषणा केली. नांदेड, परभणी, हिंगोली लोकसभा मतदारसंघासाठी २६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तर ०४ जून रोजी मतमोजणी होणार असून निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे.

देशात ७ टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. १९ एप्रिल रोजी मतदान सुरू होणार आहे. यात महाराष्ट्रात एकूण ५ टप्प्यांमध्ये मतदान होणार असून ४ जूनला मतमोजणी होणार आहे.

महाराष्ट्रात पाच टप्यात मतदान होणार :
19 एप्रिल,
26 एप्रिल,
7 मे,
13 मे,
20 मे

महाराष्ट्रात कोणत्या मतदारसंघात कधी मतदान :

पहिला टप्पा  : मतदान- 19 एप्रिल : रामटेक, नागपूर, भंडारा -गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर  (विदर्भातील 5)
दुसरा टप्पा : मतदान- 26 एप्रिल : बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी (एकूण मतदारसंघ – 8) 
तिसरा टप्पा : मतदान- 7 मे : रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले (एकूण मतदारसंघ – 11)

चौथा टप्पा : 13 मे : नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड (एकूण मतदारसंघ-11 )
पाचवा टप्पा : 20 मे : धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य, आणि दक्षिण मुंबई (एकूण मतदारसंघ – 13) 

देशात 7 टप्प्यात निवडणुका होणार :
पहिला टप्पा -19 एप्रिल
दुसऱ्या टप्प्यात – 26 एप्रिल
तिसरा टप्पा – 7 मे
चौथा टप्पा – 13 मे
पाचवा टप्पा – 20 मे
सहावा टप्पा – 7 मे
सातवा टप्पा – 1 जून

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!