Tuesday, December 3, 2024

लोक अदालतीचे यश; नांदेड जिल्ह्यातील राष्ट्रीय लोक अदालतमध्ये १० हजारांपेक्षा अधिक प्रकरणात १७ कोटी ३४ लाखांची तडजोड

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड- राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या आदेशान्वये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्रीकांत आणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली  जिल्ह्यातील सर्व न्यायालयात  दि. १२ मार्च रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय लोक अदालतमध्ये १० हजार ४०९ प्रकरणे सामोपचाराने मिटवून १७ कोटी ३३ लाख ८७ हजार ९३१ रुपयांची तडजोड करण्यात आली.

सदरील लोकअदालत यशस्वी होण्यासाठी जिल्ह्यातील सर्व न्यायाधीश, तसेच पॅनलवरील न्यायाधीश व वकिल सदस्य, तसेच पॅनल सदस्य व सर्व विधिज्ञ यांनी जास्तीत जास्त प्रकरणे निकाली काढण्यासाठी प्रयत्न केले. प्रत्येक तालुक्यासह कौटुंबिक न्यायालय, कामगार न्यायालय, सहकार न्यायालय, ग्राहक न्यायालय येथे सुध्दा त्या-त्या न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. नांदेड जिल्ह्यामध्ये १० हजार ४०९ प्रकरणे सामोपचाराने निकाली निघाली असून १७ कोटी ३३ लाख ८७ हजार ९३१ रुपये इतक्या रकमेबाबत विविध प्रकरणांत तडजोड झाली. त्यामध्ये दिवाणी, फौजदारी, एन. आय. अॅक्ट., बॅंक प्रकरणे, मोटार वाहन अपघात, भूसंपादन, ग्रामपंचायतीचे घरपट्टी व पाणीपट्टीचे प्रकरणे  व इतर, तसेच कौटुंबिक न्यायालय, कामगार न्यायालय यांच्या प्रकरणांचा व विविध बॅंकाचा तसेच विद्युत प्रकरणे, टेलिफोन, मोबाईल यांचे दाखलपुर्व प्रकरणांचा समावेश होता.

पाच दिवस घेण्यात आलेल्या विशेष मोहिमेअतंर्गत 1421 प्रकरणे निकाली काढण्यात आले आहे. नांदेड अभिवक्ता संघाचे अध्यक्ष ऍड. आशिष गोधमगावकर तसेच जिल्ह्यातील सर्व विधिज्ञ आणि विविध विमा कंपनी, भूसंपादन अधिकारी, मनपा, महसुल विभाग अधिकारी, तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड, जिल्हा वकील संघाचे माजी उपाध्यक्ष ऍड. जगजीवन भेदे व न्यायालयीन व्यवस्थापक महेंद्र आवटे, प्रबंधक व कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सदरील लोकअदालत यशस्वी करण्याकरिता व जास्तीत जास्त प्रकरणे निकाली काढण्याकरिता जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्रीकांत आणेकर, तसेच जिल्हा न्यायाधीश के. एन. गौतम व न्या. आर. एस. रोटे, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नांदेड. यांनी विशेष प्रयत्न केले.

प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्रीकांत आणेकर, यांनी लोकअदालत यशस्वी झाल्या बद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव तथा न्यायाधीश आर. एस. रोटे यांनी उपस्थित असलेल्या सर्व पक्षकार तसेच सर्व न्यायाधीश, विधीज्ञ, सर्व न्यायालयीन कर्मचारी वृंद व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नांदेड येथील कर्मचारीवृंद यांनी परीश्रम घेतले तसेच सदरील लोकअदालत यशस्वी करण्यासाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहकार्य केलेल्या सर्वांचे आभार मानुन यापुढेही अशाच सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!